घरक्राइमCruise Drugs Party : एनसीबीकडून आर्यन खानसह तीन जणांना अटक

Cruise Drugs Party : एनसीबीकडून आर्यन खानसह तीन जणांना अटक

Subscribe

मुंबई ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आज अखेर अटक केली आहे. आर्यन खानसह एकूण तीन जणांना या प्रकरणी अटक झाली आहे. यात आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे या तिघांना आता वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणीनंतर तिघांना किला कोर्टात हजर केले जाणार आहे. कोर्टात हजर केल्यानंतर एनसीबीकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर आता तिघांची अटक अवलंबून असणार आहे.

भारतीय दंड संहितेतील एनडीपीसी कायद्यातील कलम ८ सी, २० बी, २७ आणि ३५ अंतर्गत आर्यन आणि इतर दोघांविरोधात कारवाई करत अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही आज सायंकाळी ७ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

- Advertisement -

याप्रकरणी इतर ४ जणांची चौकशी सुरू असून त्यांना देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. आर्यन याच्याकडे सापडलेल्या ड्रग्सबाबत त्याने एनसीबीकडे कबूली दिली असल्याचे समजतेय. आर्यनकडून जप्त केलेले ड्रग्स हे सेवन करण्यासाठी आणले असल्याची माहिती समोर आली आहे. आत्ता या सर्वांना जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी केली जाणार आहे. तेथून त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -