घरक्राइमShirur Murder: शिरुरमधील नदीपात्रातील अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; सख्खा भाऊ आणि चुलत्याकडूनच...

Shirur Murder: शिरुरमधील नदीपात्रातील अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; सख्खा भाऊ आणि चुलत्याकडूनच खून

Subscribe

पाचर्णे मळा, शिरूर परिसरातील घोडनदीपात्रात 31 जानेवारी 2024 रोजी आढळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गूढ उकलून तीन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांना यश आलं आहे.

शिरुर: पाचर्णे मळा, शिरूर परिसरातील घोडनदीपात्रात 31 जानेवारी 2024 रोजी आढळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गूढ उकलून तीन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांना यश आलं आहे. जमीन विक्री करा म्हणून भांडण करत असल्यानं सख्खा भाऊ व चुलत्यानं हा खून केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. (Shirur Murder Unidentified body in riverbed in Shirur solved Murder by brother and cousin)

कृष्णा गोकुळ विघ्ने ( वय 32) आनंदगाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि. (बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अजिनाथ गोकुळ विघ्ने (वय, 26) पांडुरंग अर्जुन विघ्ने (वय 50, दोघे रा. आनंद गाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि.बीड), गणेश प्रभाकर नागरगोजे (वय 29, रा. एकलवाडी, ता.पाटोदा, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर येथील रामभाऊ पाचर्णे यांच्या शेताजवळ असलेल्या नदीपात्रात हात पाय बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला होता. या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने त्याला नदीत पात्रात टाकून दिलं असावं, असा संशय पोलिसांना होता. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देखमुख यांनी सूचना दिल्या होत्या, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. मृतदेह नदीपात्रातील असल्यानं त्याचा चेहरा खराब झाला होता. यामुळे त्याची ओळख पटवकण्यात अडचणी येत होत्या. स्थानिक गुन्हे पथकाने मृतदेहाची ओळख पटवत, त्याचे नाव हे कृष्णा विघ्ने असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून लगतच्या रोडचे दोन्ही बाजूकडील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आले.

तसंच, पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडूनही बातमी मिळाली की, त्या व्यक्तीच्या भावाने आणि चुलत्याने त्याचा खून केला आहे. पोलिसांनी त्यांच्या मुळ गावी बीड येथे जाऊन, मृत कृष्णा विघ्ने याचा भाऊ अजिनाथ गोकुळ विघ्ने, चुलता पांडुरंग विघ्ने आणि गणेश नागरगोजे यांना शिरूर कासार येथे सापळा रचून अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी खून केल्याची कबुली दिली. मृत कृष्णा याला दारुचे व्यसन होते. दारू पिऊन तो कुटुंबात ‘जमीन विका’ अशी मागणी करत होता. अखेर या तिघांनी कृष्णा याचा खून करण्याचं ठरवलं. त्यानुसार आरोपींनी त्याला मारहाण करून त्याचे हातपाय बांधून त्याचा मृतदेह घोडनदी पात्रात फेकून दिला होता.

- Advertisement -

(हेही वाचा: Blast in MP : मध्य प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; सहा मृत, 59 जखमी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -