Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! दीपाली चव्हाण यांच्यानंतर आता पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पूर्वी तुरेची आत्महत्या

धक्कादायक! दीपाली चव्हाण यांच्यानंतर आता पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पूर्वी तुरेची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत असलेल्या एका महिलेनं ऑफिसमध्येच पंख्याला गळफास लावून ऑन ड्युटी आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. त्या केवळ २५ वर्षांच्या होत्या. घटनास्थळी कोणतीही सुसाईड सापडली नाही. त्यामुळे पूर्वी तुरे यांनी हे पाऊल का उचललं, याबाबत गूढ निर्माण झालं आहे. तसंच या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यातील दीपाली चव्हाण या वनअधिकाऱ्यांनी आत्महत्या करत जीव संपवलं. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दीपाली चव्हाण यांच्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या पूर्वी तुरे यांनी ऑन ड्युटी जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पूर्वी तुरे यांनी घरघुती कारणांमुळे आत्महत्या केली की ऑफिसमधील कामाचा तणाव होता, हे तपासातून पुढे येईल. मात्र सध्या तरी पूर्वी तुरे यांच्या आत्महत्येवरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी नेहमीप्रमाणे पूर्वी तुरे या मुरुड येथील कार्यालयात कामानिमित्त गेल्या होत्या. त्यांचे पती सुशील तुरे हे हर्णै पोस्टात ड्युटीवर गेले. दुपारी दोघेही जेवायला घरी आले, मात्र पूर्वी तुरे न जेवताच झोपी गेल्या. सुशील हे दुपारी हर्णै पोस्टात जाऊन अडीच वाजता परत घरी आले. त्यानंतर पूर्वी या दापोली पोस्टात पैसे देवाण घेवाणीचे मशीन घेऊन जायच असल्याचं सांगून निघून गेल्या.पूर्वी तुरे यांचे पती सुशील तुरे सायंकाळी मुलाला बैलगाडीतून फिरायला घेऊन गेले. साडेसातच्या सुमारास घरी परतले असता पूर्वी घरी आलेली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मित्रासोबत दापोली येथील पोस्टात जाऊन पाहिले, पण तेथे नसल्याचे समजल्यावर हर्णै पोस्टात गेले. मात्र तिथेही त्या न आढळल्याने रात्री १०.१५ च्या सुमारास मुरूड पोस्टात गेल्यावर मुरुड पोस्ट कार्यालयाचे दार आतून बंद असल्याचे कळाले. मात्र, सुशील यांच्या पत्नी पूर्वी यांची चप्पल बाहेर दिसून आली. दार बंद असल्याने ते उघडण्याचा प्रयत्न करत असता आवाज ऐकून परिसरातील लोक तेथे आले. अखेर स्लाईडींग खिडकी उघडून आत प्रवेश केला. आत जाताच पोस्ट मास्तर पूर्वी तुरे या नायलन दोरीने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत आढळून आल्या. मात्र त्यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसल्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात राहिले आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

- Advertisement -