घरक्राइमधक्कादायक! बाप-लेकीच्या नात्याला काळिमा; बापाने केला मुलीवर अत्याचार, लेकीच्या मृत्यूनंतर आईचा आरोप

धक्कादायक! बाप-लेकीच्या नात्याला काळिमा; बापाने केला मुलीवर अत्याचार, लेकीच्या मृत्यूनंतर आईचा आरोप

Subscribe

पालघर : नालासोपाऱ्यात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बापाने स्वत:च्या 22 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पीडित मुलीच्या आईने नराधम बापाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

पीडित मुलगी ही क्षयरोगाच्या आजाराने त्रस्त असताना बापाने तिच्यावर अत्याचार केले होते. पण या पीडित मुलीचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. यानंतर पीडित मुलीच्या आईने बापाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलगी ही क्षयरोगाने त्रस्त होती आणि मुलीचा आजार बळावल्यानंतर तिच्यावर जेजे रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचारदरम्यान पीडित मुलींचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – अल्यवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; तरुणावर गुन्हा

आईच्या तक्रारीनुसार, बाप मुलीला घरात डांबून तिच्यावर अत्याचार करत होतात. या प्रकरणाची कुठे बोलू नये म्हणून बाप पीडित मुलीला मारहण करत होता. याबदद्ल कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. पण पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिच्या बापाने तिचा गर्भपात केल्याची माहिती समोर आली.

- Advertisement -

हेही वाचा – जुन्या वादातून यवतमाळमध्ये शिवसैनिकाची हत्या; जिल्हाभर तणावाचे वातावरण

अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

अल्पवयीन मुलावर 20 वर्षीय परप्रांतिय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गोविंद नगर परिसरात शुक्रवारी (दि.3) दुपारी घडली. याप्रकरणी परराज्यातील पीडित मुलाने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी उदय (20, रा. बिहार, पुर्ण नाव समजले नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित उदय व 7 वर्षीय पीडित मुलगा एकमेकांच्या ओळखीचे आहेत. उदयने पीडित मुलास आजूबाजूला कोणी नसताना बोलवून घेतले. त्यानंतर त्याच्या अनैसर्गिक अत्याचार केला. त्रास असह्य झाल्याने मुलाने कुटुंबियांना आपबिती सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी मुलासह पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात उदयविरोधात पोक्सोसह अत्याराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -