Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक: प्रेयसीची हत्या करुन भिंतीत दडवला मृतदेह

धक्कादायक: प्रेयसीची हत्या करुन भिंतीत दडवला मृतदेह

मृतदेह असलेल्या घरातच तरुणाचे वास्तव्य

Related Story

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणानं आपल्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत दडवून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. हा तरुण मृतदेह दडवलेल्याच घरात वास्तव्य करत होता. कथित प्रसंग हा धक्कादायक असून या तरुणाचे मृत तरुणीशी मागील ५ वर्षांपासून प्रेम संबंध होते. ४ महिण्यांपूर्वी तरुणाने प्रेयसीच्या घरी तिला खरेदीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. परंतु तरुणी पुन्हा घरी परतली नसल्यामुळे मृत तरुणीच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. तरुणाने संशय येऊ नये यासाठी तरुणीच्या मोबाईलवरुन मेसेज करुन घरच्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. आरोपी तरुण मृत तरुणीच्या वॉट्सएपवरुन स्टेटस अपलोड करत असे आणि सर्व मित्र मैत्रिणींशी संवाद साधत होता. आरोपी तरुणी प्रेयसीच्या नावाने तिच्या घरच्यांशी संवाद साधत आपण ठीक असून लवकरच घरी परतेल असे सांगायचा.

मृत तरुणीच्या घरच्यांना संशय आल्याने बोईसर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु करुन तरुणाला ताब्यात घेतले. तरुणाची कसून चौकशी केल्यानंतर तरुणाने कथित प्रकार उघड केला. तरुणीची हत्या करुन मृतदेह भिंतीत दडवून ठेवला. व त्यावर स्वतःच बांधकाम करुन भिंत पुन्हा बांधली असल्याचे गुन्ह्यात कबुल केले.

- Advertisement -

पोलिसांना माहिती मिळाल्यावर तात्काळ तरुणाच्या घरी दाखल झाले. भिंत तोडून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत. लग्नाची खरेदी करण्यासाठी घेऊन जात असल्याचे आम्हाला सांगितले. यानंतर बहिणीला घरी नेऊन तीची हत्या केली. आम्हाला संशय येऊ नये यासाठी तो तिच्या नावाने आमच्याशी संवाद साधत होता. मी लवकरच घरी येणार आहे. परंतु चार महिने झाले तरी बहिण परतली नसल्याने संशय आला. म्हणून आम्ही पोलिसांत तक्रार केली असल्याचे मृत तरुणीच्या भावाने सांगितले आहे.

- Advertisement -