छत्रपती संभाजीनगर : ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीनुसार प्रत्येक घरात वाद होणे हे काही नवीन नाही. पण कौटुंबिक वादामुळे पतीने चक्क आपल्या पत्नीसह मुलांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली असून या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात 16 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, महिलेच्या पतीने शेख इसाकने त्यांचे नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस शेख याकूब आणि फुरखान यांच्या मदतीने 16 ऑगस्टला रात्री वाडापावमध्ये विष कालवून पत्नीसह मुलांना खाण्यासाठी दिला होता. पण वडापावमधून वास येत असल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने मुलांना वडापाव न खाता ते फेकून दिले. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – Hyderabad Beggar : बिर्याणी-दारू अन् रिक्षाने प्रवास; भिकाऱ्यांची महिन्याला कमाई तब्बल दोन लाख रुपये
महिलेने पतीसह नातेवाईकांविरोधात तक्रार
महिलेने तक्रारीत पती शेख इसाक, नातेवाईक शेख इब्राहीम, शेख युनूस, शेख याकूब, फुरखान यांच्याविरोधाक छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.