घरक्राइमबहिणीने भावाकडे मागितली आर्थिक मदत, भावाने दिला विष पिण्याचा सल्ला

बहिणीने भावाकडे मागितली आर्थिक मदत, भावाने दिला विष पिण्याचा सल्ला

Subscribe

बहिणेने भावाकडे आर्थिक मदत मागितली होती. भावाने मदत न करता बहिणीच्या घरी विष पाठवून बहिणीसह घरातील आणखी दोघांना विष पिऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले.

पंजाबच्या गुरदासपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एकाच घरातील तिघांना विष देऊन त्यांची हत्या करण्यात आली आहे. बहिणेने भावाकडे आर्थिक मदत मागितली होती. भावाने मदत न करता बहिणीच्या घरी विष पाठवून बहिणीसह घरातील आणखी दोघांना विष पिऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले. भावाच्या अशा वागण्याचा बहिणीला मोठा धक्का बसला. गरिब बहिणीने घडलेल्या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून बहिणीने आपल्या १६ वर्षांची मुलगी आणि पतीसह विष पिऊन आत्महत्या केली. मामाच्या सांगण्यावरून आईने माझ्या वडिल आणि बहिणीसह आत्महत्या केल्याचा आरोप मुलाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती शर्मा असे मृत बहिणीचे नाव आहे. तिचा भाऊ प्रदीप शर्माकडून घेतलेले काही पैसे देणे बाकी होते. मृत बहिणीच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची आई आणि मामामध्ये काही पैशांचे व्यवहार होते. आईने मामाकडे पैशांबद्दल बोलणी केली तेव्हा मामाने आईला आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. तू जर विष घेऊन आत्महत्या केली नाहीस तर मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकण्याची धकमी दिली. आईने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल करून विष पिऊन आत्महत्या केली. मुलाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

मामानेच आईला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप मृत बहिणीचा मुलगा कुणाल शर्मा याने केला आहे. मामा आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलाने पोलिसांनाकडे केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.


हेही वाचा – नवरी फोनवर बोलली म्हणून हनिमूनच्या रात्री झाली तुफान हाणामारी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -