नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या सीतापूर येथील काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लग्नाचे वचन देऊन चार वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने राकेश राठोड यांच्यावर केला आहे. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर आज राकेश राठोड त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेत असतानाच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (Sitapur Congress MP Rakesh Rathod arrested in rape case)
लग्नाचे वचन देऊन चार वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत महिलेने पोलीस ठाण्यात काँग्रेस खासदार राकेश राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत उत्तर प्रदेश पोलिसांनी राकेश राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन दिवसांनी राकेश राठोड यांच्या वकिलांनी अटकपूर्ण जामीन मिळावा यासाठी सीतापूर येथील न्यायालयात याचिक दाखल केली होती.
हेही वाचा – Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा विजय, आप-काँग्रेस युतीचा पराभव
सीतापुर:कांग्रेस सांसद राकेश राठौर गिरफ्तार.
प्रेस कॉन्फ्रेंस के बीच पुलिस ने सांसद को आवास से हिरासत में लिया.@BJP4India@INCIndia @aditytiwarilive @sengarlive pic.twitter.com/9zAxu3Isap
— आनन्द शुक्ला (@shuklaanand27) January 30, 2025
राकेश राठोड यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान दावा केला होता की, फिर्यादीने चार वर्षांनंतर हा खटला दाखल केला होता. राकेश राठोड यांना या प्रकरणात खोटे गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही म्हटले होते. मात्र 23 जानेवारी रोजी सुनावणी करताना एमपी-एमएलए न्यायालयाने राकेश राठोड यांची याचिका फेटाळली होती. न्यायाधीश राजेश सिंह चौहान यांच्या एकल खंडपीठाने राकेश राठोड यांचा अटकपूर्व जामीनावरील सुनावणीनंतर त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. तसेच आत्मसमर्पण करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ दिला होता. मात्र त्याआधीच राकेश राठोड यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा – Ed News : 20 वर्षांत किती पैसा गोळा केला? मोदी सरकारच्या काळातील आकडा किती? ‘ईडी’नं दिला सगळा हिशेब
राकेश राठोड यांनी केले आत्मसमर्पण
दरम्यान, पोलिसांनी अटक केली असली तरी राकेश राठोड यांनी ते स्वत: पोलिसांनी शरण जात असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राकेश राठोड म्हणाले की, उच्च न्यायालयाने मला कनिष्ठ न्यायालयात हजर राहण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिला आहे. म्हणून मी या संदर्भात पोलिसांसमोर शरण जात आहे. मला खात्री आहे की, जनतेच्या न्यायालयात आणि कायद्याच्या न्यायालयात मला न्याय मिळेल. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे राकेश राठोड यांनी स्पष्ट केले.