नागपूरात हातोड्यात लपवून तब्बल ३३ तोळे सोन्याची तस्करी, 3 आरोपींना अटक

नागपूर – दुबईहून चक्क हातोड्यांत लपवून 33 तोळे सोने तस्करी करून नागपुरात आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर विमानतळावर पोलिसांनी ही कावाई केली. या प्रकरणी 3 तरूणांना अटक करण्यात आली आहे.

अक्रम मलिक दिन मोहम्मद (वय-32,नागौर, राजस्थान) इर्शाद इसाक खान (वय -21,नागौर, राजस्थान) आणि राहुल हरिश्चंद्र यादव (वय 24, आधमगड, यपी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दुबईमध्ये कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करांच्या सांगण्यावरून कुरिअर मेन म्हणून काम करत होते. नागपूर विमानतळावरून लोखंडी हातोड्याच्या आत 337 ग्रॅम सोने आरोपींना आणले होते. तिघेही राजस्थान येथील नागौरचे रहिवासी आहेत.

पाच सप्टेंबरला सकाळी सहा वाजता राजस्थानमधील नागोरी जिल्ह्यातील मोहम्मद अली उर्फ जहांगीर खान उमर (वय – ३४) याला दुबई येथील मित्र मोहम्मद उर्फ मोती खान याचा फोन आला. त्याने पाठविलेल्या सामानाची बॅग एका व्यक्तीकडून विमानतळाहून घेतली. त्यात 6 लाख किमतीचे आयफोन, अॅपल वॉच, रोलॅक्स वॉच आदी सामान होते. उमरला सकाळी सहा वाजता कारमधून आलेल्या दोघांनी लुटले. यासंदर्भात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास करत असताना गणेशपेठ पोलिसांचे पथक विमातळावर पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना तीन जणांचा संशय आला. यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता बॅगेत दोन हातोडे, स्टेपलरच्या पिन्स आणि ब्लँकेट सापडले. या बाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी सराफा व्यापाऱ्याकडे हातोडा तपासासाठी पाठवला. हातोडा फोडला तेव्हा त्यात लपविलेले सोने बाहेर आले. यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.