पुणे : कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात (Copardy Torture) 15 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. मराठा समाजाच्यावतीने संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर मोर्चे देखील काढण्यात आले होते. पोलीसांनी शीघ्र गतीने तपास करून प्रमुख आरोपी जितेंद्र शिंदेसह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मात्र आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रमुख आरोपी जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांने येरवडा कोरागृहात (Yerawada Prison) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. (Suicide of prime accused in Kopardi atrocities case Hanged in Yerwada Jail)
13 जुलै 2016 रोजी कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 15 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. मराठा समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर मोर्चे देखील काढण्यात आले होते.
पोलीसांनी शीघ्र गतीने तपास करून प्रमुख आरोपी जितेंद्र शिंदे याच्यासोबत त्याचे साथीदार संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना अटक केली होती. सुनावणीच्या वेळी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या हेतूने राज्य सरकारने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 29 नोव्हेंबर 2017 रोजी अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
हेही वाचा – ठाकरेंच्या जळगाव दौऱ्याआधी महाराष्ट्र शासनाचं महापालिका आयुक्तांना पत्र; संजय राऊत म्हणतात…
दरम्यान, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याने आज (10 सप्टेंबर) सकाळी कारागृहातील त्याच्या बॅरेकमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जेलप्रशासन हादरुन गेले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र शिक्षा भोगत असताना आरोपीने आत्महत्या केल्यामुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.