पाटणसावंगीत दोन चिमुकलींचा संशयीत मृत्यू

संशयित घटना असल्याने चाचणीसाठी रात्रीचे जेवणाचे नमुने घेतले व दोन्ही मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी मेयों हॉस्पिटल नागपूरला रवाना केले

नागपूर जिल्ह्याच्या पाटणसावंगी गावाच्या परिसरात दोन चिमुकल्या मुलींचा संशयीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. साक्षी फुलसिंग मीना वय 6 वर्ष व राधिका फुलसिंग मीना वय 3 वर्ष दोघीही राहणार बरबटेकडी ता. कोंढा जी. बारा (राजस्थान) असे मृतक मुलींचे नाव आहे.पोलिसांन कडून मिळाली माहितीनुसार दोन महिन्यापासून मुलीची आई माधुरी फुलसिंग मीना ही आपल्या पूनम, साक्षी व राधिका नामक तीन मुलीसह येथील बाजार चौक परिसरात राहणाऱ्या आई गंगाबाई भैयाजी काळे यांच्या घरी राहत होती.

आज सकाळी साक्षी व राधिका यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगून आई व आजीने दोघींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. दोघींना तपासले असता राधिकाचा आधीच मृत्यू झाला होता तर साक्षी ही अती गंभीर दिसल्याने तिला मेयों हॉस्पिटलसाठी रवाना केले पण तिचा ही रस्त्यात मृत्यू झाल्याने घरी आणले.

दोन चिमुकल्या बहिणींचा असा अचानक व संशयित मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजताच चौकशीसाठी घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक अजय चांदखेडे, सावनेर चे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर व दिलीप नागवे पोलीस ताफ्यासह दाखल झाले. संशयित घटना असल्याने चाचणीसाठी रात्रीचे जेवणाचे नमुने घेतले व दोन्ही मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी मेयों हॉस्पिटल नागपूरला रवाना केले. पुढील पोलीस तपास सुरु आहे.


हेही वाचा : सपाचे आमदार अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई