गुप्तांग दाखवणाऱ्या तहसीलदाराला विधवा महिलेने दिला चपलेचा प्रसाद

बेळगावच्या चिकोडी शहरातील धक्कादायक घटना

grade 2 Tehsildar who showed genitals was beaten by a widow women
गुप्तांग दाखवणाऱ्या तहसीलदाराला विधवा महिलेने दिला चपलेचा प्रसाद

बेळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक विधवा महिला पेंशन मागण्यासाठी गेली असता एका तहसीलदार  ग्रेड २ जमादाराने महिलेसोबत अश्लील वर्तन केले. महिलेने पेंशनच्या कामाची विचारणा केली असता तहसीलदाराने महिलेसमोर पॅन्ट काढून गुप्तांग दाखवत अश्लील हातवारे करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या विधवा महिलेने तलसीलदार ग्रेड २ जमादार यांना चपलेचा चांगला प्रसाद दिलाय. या प्रकारामुळे तहसीलदार कार्यालयात मोठी गर्दी जमून मोठी खळबळ उडाली आहे. (grade 2 Tehsildar who showed genitals was beaten by a widow women)

ही घटना आहे बेळगावच्या चिकोडी शहरातील. विधवा महिलेच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले. महिलेला एक मुलगा आहे. पेंशनच्या कामासाठी तिचा मुलगा दोन आठवड्यांपासून तहसीलदार कार्यालयात फेऱ्या मारत होता. मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी तुझ्या आईला घेऊन ये असे सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मुलगा आईसह तहसीलदार कार्यालयात पोहचला. त्यानंततर तिथल्या ग्रेड २ जमादाराने मुलाला बाहेर उभे राहण्यास सांगितले आहे आणि मुलगा बाहेर जाताच विधवा महिलेसमोर पॅन्ट काढून गुप्तांग दाखवत अश्लील भाष्य सुरु केले.

त्या जमादाराचे असे विकृत वागणे पाहून महिला कार्यालयाच्या बाहेर आली आणि बाहेर उभ्या असलेल्या मुलाला सर्व प्रकार सांगितला. संतप्त झालेल्या आई आणि मुलाने त्या ग्रेड २ जामादाराला चपलेचा चांगलाच चोप दिला. या प्रकारानंतर तहसीलदार कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली. आई आणि मुलाने सदर घटनेची पोलिसांत तक्रार करुन संबंधित जमादारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर चिकोडीच्या तहसीलदारांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन देऊन प्रकरण निवळले. मिळालेल्या महितीसमोर या जमादारावर याआधीही देखील गुप्तांग दाखवल्याचे अनेक आरोप आहेत. त्यामुळे आता नागरिकांकडूनही या जमादाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 


हेही वाचा – तू माझी झाली नाही तर, कोणाचीच होवू देणार नाही