घरक्राइमतुकाराम सुपेकडून आणखी एक घबाड पुणे पोलिसांच्या हाती, २४ तासांत ५८ लाख...

तुकाराम सुपेकडून आणखी एक घबाड पुणे पोलिसांच्या हाती, २४ तासांत ५८ लाख रुपये जप्त

Subscribe

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या कार्यालयातून आणखी एक मोठं घबाड पुणे पोलिसांच्या हाती लागलं आहे. पुणे पोलिसांनी सुपेच्या कार्यालयातून २४ तासांत ५० लाखांपेक्षा अधिकची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. याच प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या परिचिताकडून काल रात्री २५ लाख रुपये पुणे पोलिसांनी जप्त केले होते.यानंतर पुन्हा पुणे पोलिसांनी ३३ लाख रुपयांच रोकड हस्तगत केली आहे.

गेल्या २४ तासांत तुकाराम सुपेकडून पुणे पोलिसांनी ५८ लाख रुपये जप्त केले आहेत. यापूर्वी १ कोटी ५८ लाख आणि ९० लाखांचे दागिने सुपे आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आलेत. त्यामुळे तुकाराम सुपेकडून आतापर्यंत ३ कोटी ८७ लाख रुपये आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

- Advertisement -

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेची आणखी कसून चौकशी केली त्यावेळी या प्रकरणात तुकाराम सुपेची मुलगी कोमल पाटील आणि जाईव नितीन पाटील यांनी देखील मदत केल्याचं समोर आलं होतं. यावेळी या दोघांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले. या चौकशीनंतर पुणे पोलिसांनी त्यांच्याकडून १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि ७० लाखांचे सोनं जप्त केलं आहे.

तुकाराम सुपेला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी घरात छापेमारी करत ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे हस्तगत केली. तसेच सुपेने त्याच्या मित्रालाही लाखो रुपये दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी जी.ए सॉफ्टवेअर कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेय. या दोघांची सायबर शाखेत चौकशी सुरु आहे.


Maharashtra Assembly Winter Session 2021: रामदास कदमांना विधान भवनाच्या गेटवर अडवलं, RTPCR टेस्ट न केल्याने पोलिसांचा मज्जाव


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -