घरक्राइमथायलँड कॉलगर्लचे बड्या नेत्यांशी कनेक्शन उघडकीस, पोलिसांकडून ५० कॉल रेकॉर्डचे ट्रॕकिंग सुरू

थायलँड कॉलगर्लचे बड्या नेत्यांशी कनेक्शन उघडकीस, पोलिसांकडून ५० कॉल रेकॉर्डचे ट्रॕकिंग सुरू

Subscribe

लखनऊमध्ये सध्या थायलंड कॉलगर्ल मृत्यूप्रकरण जोरदार गाजत आहे. थायलंडवरून कॉलगर्ल बोलवण्यात आली होती परंतु तिचा काही दिवसांनी लखनऊमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांचा हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले असून अनेक बड्या नेत्यांची नावे यात उघडकीस आली आहेत. पोलिसांकडून सध्या ५० कॉल रेकॉर्डचे ट्रॕकिंग सुरू आहे. या प्रकरणी भाजपाचे राज्यसभा खासदार संजय सेठ यांचा मुलावर देखील आरोप केले जात आहेत. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी ती कॉलगर्ल सेठ यांच्या मुलाने बोलावली असल्याचे आरोप केले आहेत. केवळ भाजपाचा नेता म्हणूनच नाहीतर लखनऊमधील बांधकाम क्षेत्रात संजय सेठ यांचा नावाचा दबदबा आहे. त्यामुळे आयपी सिंह यांचा आरोपांमुळे राजकीय वातावरण खवळले आहे.

एका वृत्तपत्राचा माहितीनुसार, ही कॉलगर्ल गेल्या तीन वर्षांपासून लखनऊमध्ये वास्तव्यास होती. शहरातील अनेक मोठ्या स्पा सेंटरमध्ये कामाला होती दरम्यान ती काम करत असणाऱ्या स्पा सेंटरमध्ये अनेक बडे नेते, व्यावसायिक मसाजसाठी येत होते. परंतु तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे आता काही हायप्रोफाईल नावे समोर येत आहेत. ३ मे रोजी या कॉलगर्लची अचानक तब्येक खालावल्याने तिचा मृत्यू झाला असे बोलले जाते. परंतु यात अनेक राजकीय नेत्यांची नावे येत असल्याने प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते.

- Advertisement -

थायलंडहू आलेल्या या कॉलगर्लचा मृत्यू कोरोनामुळे झाला. यानंतर सोशल मीडियावर संजय सेठ आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले. यानंतर संजय सेठ यांनी पोलीस कमिशरांना पत्र लिहित याप्रकरणी विस्तृत चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणात सेछ कुटुंबियांची प्रतिमा मिलन करणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संजय सेठ यांनी केली आहे.

DCP पूर्वी संजीव सुमन यांचा माहितीनुसार. 2019 मध्ये ही महिला कामानिमित्त थायलंडहून लखनऊमध्ये आली होती. यावेळी तिची ओळख सलमान नावाच्या एका व्यक्तीशी झाली. सलमानच्या ओळखीवर तिने राकेश शर्मा या छत्तीसगडमधील व्यक्तीच्या Thai O2 या स्पा सेंटरमध्ये काम मिळवलं. सलमान त्या स्पा सेंटरचा मॅनेजर होता. हे स्पा सेंटर गोमतीनगरमध्ये सिनेपोलीस मॉलच्या जवळ आहे. या स्पामध्ये काम करण्यासाठी ती जवळच एका हॉटेलमध्ये राहत होती. परंतु ८ एप्रिलपासून हे स्पा सेंटर बंद होते. दरम्यान २३ एप्रिल रोजी तिची तब्येत बिघडत गेली या दरम्यान तिला उपचारासाठी लोहिया रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. परंतु ८ मे रोजी तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार. सलमाननेच तिला रुग्णालयात भरती केलं होतं. काम नसल्याने ती ३१ मार्च रोजीच पुन्हा लखनऊमध्ये परतली होती. डीसीपींच्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप संजय सेठ त्यांच्या मुलाचं किंवा त्यांच्या नातेवाईकांचं कोणतंही कनेक्शनसमोर आलेलं नाही. याप्रकरणी ५० हून अधिक मोबाइल क्रमाकांचे डिटेल्स मागवले आहेत. काही सोशल मीडिया अकाउंट्सही तपासले जात आहेत. याप्रकरणी पोलीस विविध बाजूने तपास करत आहेत. बड्या नेत्यांची आणि व्यावसायिकांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याने अधिक बारकाईने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


covid-19 : शरीरात कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुष मंत्रालयाचा खास टीप्स

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -