घरक्राइमठाण्यात साडेचार लाखांचा हेरॉईन जप्त, एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

ठाण्यात साडेचार लाखांचा हेरॉईन जप्त, एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

Subscribe

ठाण्यात साडेचार लाख रुपयांचे हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मोहसीन शफीक शेख (३१) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला वागळे इस्टेट, किसन नगर नंबर ३, रोड नं 22 येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी मोहसीन शफीक शेखकडून पोलिसांनी 22 ग्रॅम वजनाची हेरॉईन हा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकुण 4 लाख 50 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्याला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत निकुंभ यांना मिळालेल्या माहितीनुसार, शेख याला 11 एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 21 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता, येत्या 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ कोठून व कोणाकडून आणला? याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

- Advertisement -

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार, पोलीस निरीक्षक गिरीश बने, सहायक पोलीस निरीक्षक विकास सुर्यवंशी, पोलीस हवालदार अजय साबळे, परांजपे, अभिजीत मोरे, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ, अमोल पवार, अनुप राक्षे या पथकाने केलेली आहे.


‘सरप्राईज डेट’च्या बहाण्याने बोलवत मुलीने भावी पतीचा आवळला गळा; पुढच्या महिन्यात होते लग्न


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -