विकृत आई-वडिलांनी केला आपल्याच मुलाचा सौदा; मुलाला विकून मिळालेल्या पैशातून घेतला कुलर

मुलाला विकून मिळालेल्या पैशातून त्या विकृत आईने घरामध्ये फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिन, टी.व्ही यांसारख्या ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या आहेत

मध्य प्रदेशातील इंदौर येथील आई-वडीलांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क एका आईने आपल्या १५ दिवसांच्या नवजात मुलाला पैशांसाठी विकलेले आहे. मुलाला विकून मिळालेल्या पैशातून त्या विकृत आईने घरामध्ये फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिन, टी.व्ही यांसारख्या ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. या विकृत आईने आपल्या पतीसह हे कारस्थान रचलेले असून आई-वडीलांनी पैशांसाठी आपल्या मुलाचा सौदा केला आहे. हे प्रकरण इंदौर पोलिसांना कळताच त्यांनी आई-वडीलांसह इतर ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, इंदौर येथील हीरा नगर परिसरात राहणाऱ्या शायना बी या आरोपी महिलेने पोलिसांना कबूली देताना सांगितले की, “माझ्या पतीला आमच्या बाळाबद्दल संशय होता. त्यामुळे त्याला माझा गर्भपात करायचा होता, परंतु आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही हे मुल विकण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या मुलाला देवास येथील एका जोडप्याला विकले”. त्या मुल विकत घेतलेल्या महिलेच्या दोन मुलांचा नुकचात मृत्यू झाला होता, त्यामुळे तिने या लहान मुलाला साडेपाच लाखात विकत घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याच मुलाचा साडेपाच लाखांचा सौदा केल्यानंतर विकृत माता पित्याने घरामध्ये फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिन, टी.व्ही यांसारख्या ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या होत्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. शिवाय विकृत आई-वडीलांसह इतर ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.


 हेही वाचा :धक्कादायक! मोबाईलवर गेम न खेळू दिल्याने मुलानेच केली आईची हत्या