घरक्राइमतक्रारीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली मुलीची मागणी; काय आहे नेमके...

तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली मुलीची मागणी; काय आहे नेमके प्रकरण

Subscribe

मुंबई | घर विक्री करताना इस्टेट इजंटकडून ( Estate Agents)  झालेल्या फसवणुकीचा तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या ७३ वर्षीय वृद्ध नागरिकाकडून पोलीस (Police) निरीक्षकांनी मुलीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना भाईंदर पोलीस ठाण्यातील (Bhayander Police Station) पोलीस निरीक्षकांनी केल्याची माहितीसमोर आली आहे. भाईंदर (Bhayander) पूर्वेमध्ये राहणारे रहिवासी सोहनलाल जांगीड यांनी मुलाच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्यामुळे त्यांचे भाईंदर पश्चिममधील घर येथे आहे.

दरम्यान, घराची विक्री करताना एका महिला इस्टेट एजंट आणि घर खरेदी करणाऱ्या महिलेकडून फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी जांगीड हे भाईंदर पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांना भेटले. यानंतर जांगीड हे त्यांच्या तक्रारीनंतर आरोपींवर कारवाई झाली का, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ते पाठपुरावा करत होते. परंतु, पोलिसांनी कारवाई करण्यासाठी जांगीड यांच्याकडे पैशाची मागणी केली. जांगीड त्यांच्या मागणीनंतर ही पोलीस निरीक्षकांना पैसे दिले. तरी देखील त्यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई करत नसल्याचे जांगीडांनी विचारले. तेव्हा पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी जांगीड यांच्याकडे मुलीची मागणी केली. या घटनेनंतर जांगीड यांनी आत्मस्वाभिमान वेल्फेअर संस्थेच्या रेणू रॉय यांना माहिती दिली. यानंतर रेणू रॉय आणि त्यांचे अन्य जण पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांच्या दालनात गेले. यानंतर जांगीड आणि त्यांच्या संबंधितांनी अपशब्द, शिवीगाळ केल्याचे सांगत त्यांच्या विरुद्धात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यानंतर जांगीड, रेणू आणि त्यांच्या सहकार्याने पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांना भेटी पोलीस निरीक्षकाविरूद्ध तक्रार केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची चौकशी वसई परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त पौर्मिका चौगुले यांच्याकडे पोलीस आयुक्तांनी सोपविली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून जबाद देखील नोंदवून घेण्यात आला आहेत. पैसे दिल्याचे आणि मुलगी मागितल्याचे सर्व आरोप खोटे असून या प्रकरणी कायदेशी कारवाई करणार असल्याचे मुगुट पाटील यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -