घरक्राइमधक्कादायक: तरुणाची हत्या करून वीट भट्टीत टाकला मृतदेह

धक्कादायक: तरुणाची हत्या करून वीट भट्टीत टाकला मृतदेह

Subscribe

भट्टीमधून घानेरडा वास येऊ लागल्याने तिथे काम करणाऱ्या मजुरांना भट्टीच्या खाली मृतदेह असल्याचा संशय आला.

राजस्थानमध्ये एका तरुणाची हत्या करून त्याला वीट भट्टीमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात दिवसांपूर्वी हा तरूण हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. वीट भट्टीमधून घानेरडा वास येऊ लागल्याने तिथे काम करणाऱ्या कामगारांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. कामगारांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वीट भट्टीची योग्य पाहणी केल्यानंतर भट्टीच्या खाली गाडण्यात आलेला तरुणाचा मृतदेह समोर आला. विवाहबाह्य संबंधातून ही हत्या करण्यात आली असवी असा अंदाज लावण्यात येत आहे.

वीट भट्टीत सापडलेल्या मृत व्यक्तीची सात दिवसांपूर्वी गायब झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तरुणाचा मृतदेह सापडताच पोलिसांनी या घटनेची चौकशी करायला सुरूवात केली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनच्या परिसरात समसपुर येथे असलेल्या वीट भट्टीवर काही मजूर काम करत होते. याच दरम्यान भट्टीमधून घानेरडा वास येऊ लागल्याने तिथे काम करणाऱ्या मजूरांना भट्टीच्या खाली मृतदेह असल्याचा संशय आला. मजूरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून वीट भट्टीची योग्य पाहणी करण्यात आली. त्याचवेळी कच्चा वीटांच्या भट्टीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.

- Advertisement -

सात दिवसांपूर्वी खेडली भैडोलिया येथे राहणाऱ्या महेंद्र मीणा नावाचा तरूण हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. वीट भट्टीत सापडेलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याचा भाव भरत मीणाला बोलवण्यात आले. मिळालेल्या महितीनुसार, २१ डिसेंबरला राकेश मेघवाल नावाचा एक ठेकेदार मृत तरूण आणि त्याच्या बायकोला घेऊन वीट भट्टीवर गेला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे बायको सोबत भांडण झाले. त्यानंतर मृत महेंद्र ५०० रूपये घेऊन घराबाहेर निघून गेला. भाव अचानक घरातून निघून गेल्यानंतर लहान भावाने त्याची शोधाशोध सुरू केली. शोधाशोध करून शोध न लागल्याने लहान भावाने त्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर ठेकेदार आणि मृताची पत्नी ही गायब असल्याची माहिती दिली पोलिसांना मिळाली आहे. या हत्येमागचे खरे कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. विवाहबाह्य संबधातून ही हत्या करण्यात आली आहे असे म्हटले जात आहे.


हेही वाचा – भंगारच्या वादातून अपहरण करून अडीच लाख उकळले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -