घरात पैसा ठेवत नाही, मग टाळा का लावता? उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी चोराने सोडली चिठ्ठी

thieves letter after stealing devas deputy collector bungalow in madhya pradesh
घरात पैसा ठेवत नाही, मग टाळा का लावता? उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी चोराने सोडली चिठ्ठी

चोरी करण्यासाठी चोर कधी काय करतील याचा नेम नाही. मध्य प्रदेशमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. चोराने चक्क उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन आखला. चोरीच्या उद्देशाने जेव्हा चोराने त्यांच्या घरात प्रवेश केला तेव्हा त्याच्या हाती पैसा लागला नाही. मात्र चोराने यावर निराश न होता चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नावे एक चिठ्ठी सोडली. या चिठ्ठीत चोरीने लिहिले की, जर तुम्ही घरात पैसा ठेवत नाहीत मग टाळा का लावून ठेवला आहे? या चिठ्ठीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातील चोरीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

thieves letter after stealing devas deputy collector bungalow in madhya pradesh
घरात पैसा ठेवत नाही, मग टाळा का लावता? उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी चोराने सोडली चिठ्ठी

उपजिल्हाधिकारी त्रिलोचन गौड यांचा बंगला अशा जागी आहे ज्याठिकाणीहून खासदारांचा बंगला हाकेच्या अंतरावर आहे. तर दुसऱ्या बाजूला एसडीएम प्रदीप सोनी यांचा बंगला आहे. तर याच बंगल्याच्या १०० मीटर अंतरावर एसपींचा बंगला आहे. त्यामुळे कडक बंदोबस्ताच्या ठिकाणी चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मात्र चोरांनी घरातून रोख आणि चांदीचे दागिने वगळता इतर कोणतीही वस्तू न चोरल्याने चोरी करणारा चोर सराईत गुन्हेगार असल्याचे दिसून येतेय. दरम्यान त्रिलोचन गौड गेल्या १५ ते २० दिवसांपासून घरी आली नव्हते त्यामुळे त्यांच्या घराला टाळा होता.

पाकिस्तानमध्ये ‘थलायवी’ टॉप ट्रेंडला, कंगना म्हणतेय ‘देशद्रोही फक्त भारतात नाही तर पाकमध्येही’