नवी दिल्ली : घराच्या तुलनेत बॅंकचे लॉकर अधिक सुरक्षित मानले जातात. घरात चोरी होण्याच्या भीतीने लोक बॅंकांच्या लॉकरमध्ये पैसा अडका, सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यावान वस्तू ठेवण्याला प्राधान्य देतात. मात्र आता बँकेत पैसे आणि सोने ठेवू की नये, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडले, अशी एका घटना समोर आली आहे. तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील एका बँकेत चोरट्यांनी टाकलेल्या दरोड्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. (Thieves steal gold worth nearly 14 crores from SBI bank in Telangana Warangal district)
मिळालेल्या माहितीनुसार, वारंगल जिल्ह्यातील रायपर्थी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेवर दरोडा टाकून सुमारे 19 किलो सोन्याचे दागिने पळवले आहे. या दागिन्यांची किंमत 13.61 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दागिने लुटण्याबरोबरच दरोडेखोरांनी बॅंकेतील सीसीटिव्ही फुटेजचे डीव्हीआरही नेले आहेत. जेणेकरून पोलिसांना कोणताही पुरावा मिळू नये. तेलंगणातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दरोडा म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी बँकेच्या आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासण्यासाठी अनेक पथके तैनात केली आहेत.
हेही वाचा – Pakistan News : ऐकावे ते नवलंच! हजारो लोकांना मेजवाणी देण्यासाठी भिकाऱ्याने खर्च केले 1.25 कोटी
Warangal, Telangana | 19 kg of gold ornaments, valued at approximately Rs 13 crore, were stolen from the strongroom in the State Bank of India (SBI) branch in Rayaparthy, Warangal district, on Monday midnight. The police have registered a case and are investigating. Police have…
— ANI (@ANI) November 21, 2024
एका अधिकाऱ्याने सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांना मंगळवारी चोरी झाल्याचे समजले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे इतके हुशार होते की त्यांनी सीसीटीव्ही तर फोडलेच पण डीव्हीआरही सोबत नेले आहेत. तसेच दरोडेखोरांनी शाखेत प्रवेश करण्यासाठी गॅस कटरचा वापर केला होता. अशाप्रकारे बँक लुटण्याची पद्धत 2022 मध्ये निजामाबाद जिल्ह्यातील मेंदोरा मंडलातील बुस्सापूर गावात झालेल्या दरोड्यासारखीच आहे. त्यामुळे या दरोड्यात एका संघटित आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यामुळे चोरट्यांना पकडण्यासाठी सध्या चार पथके तैनात केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा – Crime : किटी पार्टीमध्ये झाली कोट्यवधींची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?