मुंबई : ग्रँटरोड आणि कांदिवली परिसरातून एका महिलेसह तीन बांगलादेशी नागरिकांना समतानगर आणि डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. पिंकी ऊर्फ शिरीन मणीरज्जन मॉनिर शेख, मोहम्मद रोबिउल मोयाज्जेम हुसैन आलम आणि मोहम्मद रिदोय हुसैन मियॉं अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (three bangladeshi nationals arrested from grant road kandivali samatanagar D. B Marg police action)
ग्रँटरोड आणि कांदिवली परिसरात काही बांगलादेशी नागरिक नोकरीच्या शोधात फिरत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी समतानगर पपोलिसांच्या एका विशेष पथकाने कांदिवलीतील आकुर्ली रोड, संदीप हॉटेल गल्ली परिसरातून मोहम्मद रोबिउल आलम आणि मोहम्मद रिदोय या दोघांना तर डी. बी मार्ग पोलिसांनी ग्रॅटरोड येथील अली शॉ रोड, एल. टी मार्केट परिसरातून पिंकी ऊर्फ शिरीन या ३६ वर्षांच्या महिलेस अटक केली.
चौकशीदरम्यान या तिघांनी ते बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशातील गरीबीसह बेरोजगारीला कंटाळून ते तिघेही भारतात पळून आले होते. दिवसभर नोकरीचा शोध घेतल्यानंतर ते तिघेही रात्रीच्या वेळेस फुटपाथवर झोपत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल, सिमार्ड जप्त केले आहे. या मोबाईलची पाहणी केल्यानंतर ते दोघेही त्यांच्या बांगलादेशातील कुटुंबियांसह नातेवाईक मित्रांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा – Pune Crime : आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा मृतदेह सापडला; आज सकाळीच झाले होते अपहरण
Edited by : Ashwini A. Bhatavdekar