Homeक्राइमTriple Murder : दोन भावांमध्ये जमिनीचा वाद; कुऱ्हाडीने हल्ला करत केली तिघांची...

Triple Murder : दोन भावांमध्ये जमिनीचा वाद; कुऱ्हाडीने हल्ला करत केली तिघांची हत्या

Subscribe

छत्तीसडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन भावांमधील जमिनीचा वाद रक्तरंजित झाल्यावर शांत झाला. आरोपी भावाच्या कुटुंबातील सदस्यांनी शेतात काम करणाऱ्या कुटुंबाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला.

छत्तीसगड : गेल्या काही काळापासून देशभरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. अशातच छत्तीसडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन भावांमधील जमिनीचा वाद रक्तरंजित झाल्यावर शांत झाला. आरोपी भावाच्या कुटुंबातील सदस्यांनी शेतात काम करणाऱ्या कुटुंबाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला. (Three killed in land dispute in Chhattisgarh)

मिळालेल्या माहितीनुसरा, जगन्नाथपूरच्या डुबकापारा येथे एकाच कुटुंबातील दोन गटांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. मात्र तरीही उमेश टोप्पो, नरेश टोप्पो त्यांचची आई बसंती टोप्पो आणि त्यांचे वडील माघे टोप्पो हे आज शेती करण्यासाठी जमिनीवर गेले होते. यानंतर दुपारी 1 च्या सुमारास, माघे टोप्पोच्या भावाच्या कुटुंबातील सहा ते सात सदस्यही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. भावाच्या कुटुंबाने माघे टोप्पोच्या कुटुंबावर कुऱ्हाडीने आणि लाठीकाठीने हल्ला केला. या हल्ल्यात बसंती टोप्पो (55) आणि नरेश टोप्पो (30) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर माघे टोप्पो (57) हे सुद्धा गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यादरम्यान उमेश टोप्पोने पळून जाऊन स्वत:ला जीव वाचवला आणि गावकऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या हल्ल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा – Crime : एआयच्या मदतीने 19 वर्षांपूर्वीच्या तिहेरी हत्याकांडाचा छडा; महिला आणि 17 दिवसांच्या मुलींच्या हत्येचं प्रकरण 

घटनेची माहिती मिळताच, खरगव्हाण चौकीचे प्रभारी योगेंद्र जयस्वाल यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या माघे टोप्पोला अंबिकापूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर माघे टोप्पोच्या भावाच्या कुटुंबातील आरोपी सदस्य फरार झाले आहेत. ज्या जमिनीप्रकरणी वाद ती जगन्नाथपूर कोळसा खाणींसमोर आहे. या जमिनीवर हल्ला करणाऱ्या कुटुंबाने शेती करण्याचे सांगितले होते. मात्र माघे टोप्पो यांचे कुटुंब आज शेती करण्यासाठी पोहचवर वाद झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच फरार आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक करू, असेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – Meerut Crime : पती-पत्नीचे हायपाय बांधलेले, तर 3 मुलींचे बेडच्या आतमध्ये आढळले मृतदेह