मुलाला मारण्याची धमकी देत अत्याचार

जळगाव : मुलाला मारण्याची धमकी देत पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर अत्याचार झाला आहे. तसेच महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली व पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी गुरुवारी पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अनिल देविदास काळे, संदीप जाधव, अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २४ वर्षीय महिला ही बकरीचा चारा घेण्यासाठी गेली असता नितीन एकनाथ जाधव याने पिडीत महिलेस तिच्या मुलाला मारण्याची धमकी देत जबरदस्ती अत्याचार केला. या अत्याचाराबाबत पिडीत महिलेने आपल्या पतीस सांगितले. पिडीत महिलेच्या पतीने नितीन जाधव यास याबाबत विचारले असता त्याने त्याला देखील शिवीगाळ केली. तसेच १९ एप्रिल २०२२ रोजीच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आनिल काळे, संदीप जाधव आणि एका महिलेने पिडीतेच्या घरात. घुसून शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.