Eco friendly bappa Competition
घर क्राइम अमरावतीत उदयपूर घटनेची पुनरावृत्ती? नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ बोलल्याने केमिस्टची हत्या

अमरावतीत उदयपूर घटनेची पुनरावृत्ती? नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ बोलल्याने केमिस्टची हत्या

Subscribe

अमरावती येथील मेडिकल स्टोअरचे केमिस्ट कोल्हे त्यांनी देशात नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाला विरोध होत असताना त्या विधानाच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती

महाराष्ट्राच्या अमरावतीमध्येही उदयपूर ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. गेल्या 21 जून रोजी अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या केमिस्टने भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या, त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ही घटना उदयपूर घटनेप्रमाणे असल्याचे दावा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी देखील केला आहे.

या हत्ये प्रकरणाची चौकशीसाठी आता एनआयएचं पथक अमरावतीमध्ये दाखल झाले असून तपास सुरु आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. तर या हत्येमागचा सूत्रधार शोधण्यासाठी भाजपकडून एसआयटीमार्फत चौकशी (SIT) करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

अमरावती येथील अमित मेडिकलचे संचालक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी निर्घृण हत्या झाली. राजस्थानच्या उदयपूरमधील हत्येप्रमाणेच ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या आणि म्हणून त्यांची हत्या झाल्याचा अंदाज खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वर्तवला आहे. याप्रकरणी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितले की, केमिस्टच्या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे, यातील मुख्य आरोपी इरफान खान हा फरार आहे. इरफान हा एक एनजीओ चालवतो.

२१ जून रोजी केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते. त्यांच्यासोबत दुसऱ्या गाडीवर पत्नी आणि त्यांचा 27 वर्षीय मुलगा संकेत होता. काही अंतर गेल्यावर काही दुचाकीस्वारांनी केमिस्ट उमेश यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा जीव घेतला. याप्रकरणी केमिस्ट उमेश यांचा मुलगा संकेत याने अमरावती येथे राहणारे मुदस्सीर अहमद (२२), शाहरुख पठाण (२५), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२) आणि अतीब रशीद (२२) यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहेत.

whatsapp ग्रुपमध्ये केली होती पोस्ट शेअर

- Advertisement -

कोल्हे यांचे अमरावती येथे मेडिकल स्टोअर आहे, त्यांनी देशात नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाला विरोध होत असताना त्या विधानाच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या ग्रुपमध्ये काही मुस्लिम बांधवही होते. पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. यावेळी आरोपी इरफान याने ती पोस्ट पाहिली आणि कोल्हे यांना मारण्यासाठी पाच जणांना पाठवले. यासाठी या मारेकऱ्यांना इरफानच्या वतीने 10 हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासोबतच घटनेनंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावती पोलिसांनी या हत्येनंतर एक एक प्रेसनोट जारी केली आहे. ज्याच त्यांनी या गुन्ह्यासंबंधात कोणीही धार्मिक तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य करू नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गुन्ह्याचा सर्व बाजूनं तपास तसेच तांत्रिक दृष्ट्या सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती दिली आहे.

अमरावतीच्या खासदारांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र 

अमरावतीमधील या हत्येप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अमरावती पोलिसांवर कारवाईत हयगय केल्याचा ठपका ठेवत अमरावती पोलिसांवरचं कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अमरावती पोलीस आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही 21 जून रोजी महाराष्ट्रात अमरावतीतील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) हाती घेण्याचे निर्देश दिले आहे.

यानंतर एचएमओने ट्विट करत माहिती दिली की, 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्रातील उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्येशी संबंधित प्रकरणाचा तपास एमएचएने एनआयएकडे सोपवला आहे. हत्येमागील कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल. आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर आयपीसी कलम ३०२ (हत्या), १२० बी (गुन्हेगारी कट), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अल्पवयीनांची नवी फॅशन; अवैध शस्त्र बाळगण्याची पॅशन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -