उदयपूर हत्याकांडात अखेर खुलासा, पाकिस्तानातून आले होते कन्हैयालालच्या हत्येचे आदेश

कन्हैया लाल याच्या हत्येचे आरोपी गौस आणि रियाज, यांना हत्या करण्याचे आदेश पाकिस्तानातून आले होते अशी माहिती आता समोर आली आहे.

उदयपूर(udaipur murder case) मध्ये झालेल्या कन्हैया लाल(kanhaiya lal) याच्या हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून टाकले होते. आणि आता त्याच हत्ये संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. कन्हैया लाल याच्या हत्येचे आरोपी गौस आणि रियाज, यांना हत्या करण्याचे आदेश पाकिस्तानातून आले होते अशी माहिती आता समोर आली आहे. त्याच संदर्भात गौस आणि रियाज य यादों आरोपींनी कन्हैया लालची हत्या केल्याv नंतर त्यांना एका व्हाट्सअप ग्रुप वर एक मेगेज आला होता. त्यात लिहिलं होतं, की ‘तुम्हाला जो टास्क दिला होता तो पूर्ण झाला’. दरम्यान या व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाकिस्तानातील काही लोक सुद्धा सहभागी होते. या हत्याकांडाची सगळी सूत्रं ही पाकिस्तानातून हलवली जात होती आणि या हत्याकांडा संदर्भात पुढे काय करायचं ही माहिती सुद्धा पाकिस्तानातूनच येत होती. दरम्यान पाकिस्तान मध्ये असलेली व्यक्ती ही आरोपींना तिथून मेसेज पाठवत होती. आणि याच व्यक्तीच्या सांगण्यावरून या दोन आरोपींनी धारधार शस्त्र सुद्धा तयार करून ठेवली होती.

 

आणखी वाचा – मुंबईच्या कांदिवली परिसरात आढळले चार मृतदेह 

दरम्यान कन्हैया लाल(kanhaiya lal) याच्या हत्याकांडा संदर्भातील सर्व घडामोडी या पाकिस्तानातून घडत होत्या आणि त्यासंदर्भातील आदेश हे आरोपींपर्यंत वेळोवेळी पोचवले जात होते. हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार एस. के इंजिनियरिंग फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आले होते. या हत्याकांडातील(udaipur murder case) आरोपी रियाज आणि गौस यांनी काही व्हिडिओ सुद्धा बनविले होते आणि ते व्हिडिओ बनविण्यामागचा मागचा आरोपींचा उद्देश दहशत पसरविणे हा होता. आणि ह्या सगळ्या घडामोडी पाकिस्तानातून घडत होत्या हे वृत्तही समोर आले.

आणखी वाचा –  अयोध्येत मोठ्या घातपाताचा प्रयत्न; आढळले बेवारस 18 हातबॉम्ब

आणखी वाचा – विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी

 

उदयपूर येथे घडलेली कन्हैया लालच्या हत्येची घटना हृदय पिळवटून टाकणारी होती. त्याच बरोबर या हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. उदयपूर हत्याकांडामुळे संपूर्ण देशभरातच संतापाची लाट उसळली होती. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश सुद्धा दिसत होता. या हत्याकांडा संदर्भात समोर आलेली महत्वाची माहिती अशी, की या संदर्भात एक सफेद रंगाची स्कुटी मिळाली आहे जी आरोपी गौस याच्या नावावर नोंदणीकृत आहे आणि दुसऱ्या दिवशी आरोपी रियाज याची बाईक सुद्धा सापडली. कन्हैया लाल हत्याकांडाविरोधात(udaipur murder case) राजस्थान मधील काही शहरांमध्ये बंद सुद्धा पुकारला गेला आहे.

 

आणखी वाचा –  खरी शिवसेना कोणाची?, मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल

उदयपूर मध्ये झालेल्या कन्हैया लाल हत्याकांडात(udaipur murder case) प्रत्येक दिवशी एक नवीन माहिती समोर येत होती. या हत्याकांडात रियाज आणि गौस हे दोन मुख्य आरोपी आहेत तर त्यांच्या सोबत आणखी काही जण सुद्धा सहभागी आहेत. रियाज आणि गौस यांनी कन्हैया लालची हत्या केल्या नंतर त्या ठिकाणाहून या दोन मुख्य आरोपींना पळून जाण्यात आणि या हत्याकांडाचं बॅक प्लॅन करण्यात आणखी चार ते पाच आरोपींचा समावेश आहे. त्याच दरम्यान या दोन आरोपींकडे आणखी काही हत्यारं सुद्धा होती. त्याच बरोबर ज्या आरोपींना पकडले आहे त्यांची चौकशी करत असताना ही सगळी माहिती पोलिसांसमोर आली. कन्हैया लाल हत्याकांडातील आरोपींना(udaipur murder case) जयपूर एन. आई. ए च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येईल. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.