Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम कुख्यात अरविंद सोढा टोळीचा गुंड उमेश उर्फ गावठी जेरबंद 

कुख्यात अरविंद सोढा टोळीचा गुंड उमेश उर्फ गावठी जेरबंद 

Related Story

- Advertisement -

एकेकाळचा कुख्यात गुन्हेगार अरविंद सोढा टोळीतील खतरनाक गुंड उमेश जवंजाळ उर्फ गावठी याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या पथकाने बुधवारी केली. अटक करण्यात आलेल्या गुंड उमेशचा ताबा पुढील तपासासाठी नवीमुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

मुंबईतील पूर्व उपनगतील एकेकाळाचा कुख्यात गुंड अरविंद सोढा टोळीतील खतरनाक गुंड उमेश जवंजाळ उर्फ गावठी हा मंगळवारी सायंकाळी फोर्ट परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ५ चे पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मिळाली. सपोआ अविनाश शिंगटे, कक्ष ५ चे प्रभारी पोनि जगदीश साईल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चव्हाण, सपोनि महेंद्र पाटील, महेश बंडगर आणि पथक यांनी सादर ठिकाणी सापळा रचून उमेश जवंजाळ उर्फ गावठी याला ताब्यात घेऊन कक्ष ५ च्या कार्यालयात आणून त्याची चौकशी केली असता उमेश याच्यावर नवी मुंबईत खून, खुनाचा प्रयत्न सारखे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.

- Advertisement -

उमेश जवंजाळ उर्फ गावठी  हा पूर्वी मुंबईतील प्रतीक्षा नगर येथे राहण्यास होता त्यावेळी त्याच्यावर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात मारामारी, खुनाचा प्रयत्न यासारखे अनेक गुन्हे दाखल असून चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यात त्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल असून त्यात त्याला अटक झाली होती. २०१६ मध्ये जामिनावर  बाहेर आल्यानंतर त्याने नवीमुबईतील कामोठे येथे एका खून केला होता त्यानंतर  तो फरार झाला होता. उमेश जवंजाळ उर्फ गावठी याच्यावर वर्षी पोलिसांनी २०१८ मध्ये संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती, मात्र तो पोलीसाच्या हाती लागला नव्हता अशी माहिती पोनि योगेश चव्हाण यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या उमेश जवंजाळ उर्फ गावठी याला अटक करून पुढील तपासासाठी त्याचा ताबा नवी मुंबईकडे सोपवण्यात आला आहे.  

- Advertisement -