Homeक्राइमUP Murder Case : विचारलेल्या तीन प्रश्नांमध्ये झाली नाही पास, प्रियकराने प्रेयसी केली 'खल्लास'

UP Murder Case : विचारलेल्या तीन प्रश्नांमध्ये झाली नाही पास, प्रियकराने प्रेयसी केली ‘खल्लास’

Subscribe

उत्तर प्रदेशमीधील संत कबीरनगर येथील ही घटना पाच डिसेंबर रोजीची आहे. 5 डिसेंबर रोजी एका खाली मकानामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला होता.

लखनऊ : गुन्हेगारीचे स्वरूप काहीसे नाही तर मोठ्या स्वरुपात बदल्याचे चित्र आहे. नवी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडापासून तर मुंबईतील मीरारोड भागातील सरस्वती वैद्य मर्डर केस असो. अगदी भीतीदायक या घटना आपल्या देशात घडत असून, खुनाच्या घटनांपैकी अनेक घटनांमध्ये प्रेमप्रकरण आणि लिव्ह इनची किनास असते. असे असतानाच उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने विचारलेल्या तीन प्रश्नांचे उत्तर न देऊ शकणाऱ्या प्रेयसीचा त्याने मुडदाच पाडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (UP Murder Case Did not pass in three questions asked boyfriend cheated on girlfriend)

उत्तर प्रदेशमीधील संत कबीरनगर येथील ही घटना पाच डिसेंबर रोजीची आहे. 5 डिसेंबर रोजी एका खाली मकानामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला होता. घटनेपासून आज 10 डिसेंबरपर्यंत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावत एका तरुणाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे मृतक तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिची हत्या करण्यापूर्वी त्याने त्याची प्रेयसी असलेल्या तरुणीला तीन प्रश्न विचारले होते, ज्यांचे ती उत्तर देऊ शकली नाही. याचा राग डोक्यात घेऊन त्यांने तिचा खूनच केला.

ही घटना कोतवाली खलीलाबाद परिसरातील देवदार गावात घडली. जिथे एका रिकाम्या घरात एका मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, मृतक तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिशुपाल गौतम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अलीकडेच प्रभारी निरीक्षक ब्रजेंद्र प्रसाद पटेल यांच्या पथकाने आरोपीला दलेलगंजजवळ अटक केली.

हेही वाचा : CHHATTISGARH CM : विष्णूदेव साय बनणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री; राजस्थान, MP बाबत खलबतं सुरूच

टॉवेलने गळा आवळून केला खून

आरोपी तरुणांने त्याची प्रेयसी असलेल्या तरुणीचा टॉवेलने गळा आवळून खून केला आणि मृतदेह घराच्या आतील खोलीत लपवून ठेवला. पोलिसांनी आरोपीला राष्ट्रीय महामार्ग दलेलगंज येथील कोतवाली परिसरातून अटक केली आणि हत्येसाठी वापरलेला टॉवेलही जप्त केला.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir: मोदींनी मंदिर बांधलं आणि तारीखही सांगितली; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

या प्रश्नांचे उत्तरं देण्यास ठरली ती अपयशी

घटनेच्या काही दिवसानंतर पोलिसांनी योग्य तो तपास करत आरोपीस अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीतून धक्कादायक माहिती समोर आली. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या प्रेयसीला तीन प्रश्न विचारले की ज्याचे तिने नीट उत्तर दिले नाही. विचारलेल्या प्रश्नांपैकी पहिला प्रश्न होता की, ज्याच्याशी लग्न ठरले होते त्या व्यक्तीला तू किती वेळा भेटली, आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल तुझ्या घरच्यांना आधी का नाही सांगितलं? तिसरा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे तू मला सोडून दुसऱ्याशी लग्न करायला कसे मान्य केले असे प्रश्न त्याने विचारले. या प्रश्नांचे उत्तरं देण्यास ती असर्थ ठरल्याने तिला यमसदनीच पाठवले.