घरक्राइमपॉर्न बघून अल्पवयीन मुलींचा घ्यायचा शोध, नराधमाने ३० मुलींना केलं शिकार

पॉर्न बघून अल्पवयीन मुलींचा घ्यायचा शोध, नराधमाने ३० मुलींना केलं शिकार

Subscribe

सात वर्षांच्या काळात एकूण 30 अल्पवयीन मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या करणाऱ्या विकृताला अखेर दोषी ठरवण्यात आलं आहे. येत्या दोन आठवड्यात नराधम आरोपली शिक्षा सुनावली जाणार आहे.

सात वर्षांच्या काळात एकूण 30 अल्पवयीन मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या करणाऱ्या विकृताला अखेर दोषी ठरवण्यात आलं आहे. येत्या दोन आठवड्यात नराधम आरोपली शिक्षा सुनावली जाणार आहे. दोषीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पीडित मुलींच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. रवींद्र कुमार असं त्या नराधम विकृताचं नाव आहे. ( Uttar Pradesh watching porn search minor children to rape killed 30 girls serial killer ravindra Kumar convicted )

रवींद्र कुमार हा उत्तर प्रदेशातील कासगंज येथील रहिवासी असून तो 2008 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी कामाच्या शोधात दिल्लीत आला होता. त्याचे वडील प्लम्बरींगचं काम करायचे तर आई इतरांच्या घरात घरकाम करुन उदरनिर्वाह चालवायची. दिल्लीत आल्यावर रवींद्रने मजुरीचे काम सुरु केले. मजुरीचे काम करतानाच रवींद्र अंमली पदार्थांच्या आहारी गेला. त्याला पॉर्न फिल्म पाहण्याचेही व्यसन जडले. पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर तो अल्पवयीन मुलींच्या शोधात फिरायचा. मुलगी एकटी असल्याचे दिसताच बलात्कार करुन तिची हत्या करायचा.

- Advertisement -

2008 ते 2015 या काळात केले 30 खून

रवींद्र दिवसभर मजुरी करायचा आणि सायंकाळी अंमली पदार्थांचे सेवन करायचा. त्यानंतर पॉर्न फिल्म बघून रात्री 8 ते मध्यरात्रीपर्यंत झोपडपट्टीमध्ये अल्पवयीने मुलींच्या शोधात निघायचा. अल्पवयीन मुलींवर शिकार बनवण्यासाठी तो कधीकधी 40 किलोमीटरपर्यंत चालायचा आणि झोपडपट्टी, बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये भटकायचा. पैसे, चॉकलेट यांचं आमिष दाखवून मुलींना निर्जनस्थळी घेऊन जायचा आणि बलात्कार करुन त्यांची हत्या करायचा. 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुली त्याच्या टार्गेटवर असायच्या. 2008 ते 2015 या सात वर्षांच्या काळात त्याने 30 अल्पवयीने मुलींना वासानाचे शिकार बनवले आणि त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

( हेही वाचा: तीन महिन्यांनंतरही अपहृत मुलगी बेपत्ताच; आई-वडिलांसमोर केले होते अपहरण )

- Advertisement -

2015 मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याच्यावर खटला दाखल झाला. त्याआधी 2014 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्यावर 6 वर्षांच्या मुलीचं अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि शारिरिक अत्याचार केल्याचा आरोप होता. नराधमाने चिमुकलीचं अपहरण केल्यानंतर तिला सेप्टिक टॅंकमध्ये फेकून दिलं होतं.यानंतर, 2015 मध्ये 6 वर्षीय मुलीच्या प्रकरणाचा तपास करत असेलेल्या पोलिसांनी त्याला दिल्लीच्या रोहिणी येथील सुखबीर नगर बसस्थानकाजवळून अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -