Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम वडा-पाव विक्रेत्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ४ महिन्यानंतर आरोपी गजाआड

वडा-पाव विक्रेत्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ४ महिन्यानंतर आरोपी गजाआड

Related Story

- Advertisement -

घणसोली परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन फरार झालेल्या नराधामला नवी मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. चार महिन्यानंतर फरार आरोपी रबाळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सुमित प्रमोदकुमार साह (२७) असे या आरोपीचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याला बलात्कारासह पोक्सो कलमाखाली अटक केली आहे.

सुमित कुमार साह हा मुळचा बिहार मधील रहिवाशी आहे. सध्या तो घणसोली भागात राहत असून वडापावच्या गाडीवर काम करत होता. तर या घटनेतील पीडित मुलगी देखील घणसोली परिसरात राहते. वर्षभरापुर्वी आरोपी सुमित साह याने पीडित मुलीसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत शारीरीक संबध प्रस्थापित करुन पलायन केले होते. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिल्याने तिच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर सदर मुलगी ८ महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. त्यानुसार रबाळे पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुमित साहच्या विरोधात चार महिन्यापुर्वी बलात्कारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता.

- Advertisement -

तपास अधिकारी दत्तात्रय ढुमे यांनी सदर गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपीचा सातत्याने शोध घेत असताना आरोपी हा घणसोली परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी त्यास २५ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने गुह्याची कबुली दिली. तसेच २०१८ मध्ये देखील त्याने अशाचप्रकारे एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले असल्याचेही मान्य केले. त्यामुळे २५ सप्टेंबर २०१८ रोजी नोंद झालेल्या गुन्ह्यातील तो आरोपी हाच असल्याचेही निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने या आरोपीची २ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

- Advertisement -