घरक्राइमVasai Crime : चिडवल्याचं निमित्त अन् अल्पवयीन मुलाने चिमुरडीला संपवलं; गुन्हा लपवण्यासाठी...

Vasai Crime : चिडवल्याचं निमित्त अन् अल्पवयीन मुलाने चिमुरडीला संपवलं; गुन्हा लपवण्यासाठी वडिलांनी केलं ‘हे’ काम

Subscribe

वसई : शेजारी राहणारी लहान मुलगी शेंबडा म्हणून चिडवते, त्यामुळे राग अनावर झालेल्या झालेल्या अल्पवयीन मुलाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई फाटा (Vasai) परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मुलाच्या वडिलांना या घटनेची माहिती असूनही त्यांनी चिमुरडीचा मृतदेह बंद ठेवल्याचे पेल्हार पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सध्या आरोपी अल्पवयीन मुलगा फरार असून पोलिसांनी त्याच्या वडिलांनी अटक केली आहे. (Vasai Crime The pretext of teasing and the minor killed the girl Father did work to hide the crime)

हेही वाचा – भारताच्या आणखी एका दुश्मनाला कंठस्नान; लष्कर-ए-तोयबाच्या प्रमुख दहशतवाद्याची पाकिस्तानात हत्या

- Advertisement -

जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकली 1 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घराजवळील दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली होती. पण बराच वेळ ती घरी परतली नाही. चिमुकली अचानक गायब झाल्याने चिंतेत असलेल्या तिच्या वडिलांनी 1 डिसेंबर रोजी मिसिंग तक्रार पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल केली. तसेच घरच्यांनी चिमुकलीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 20 हजारांची रक्कम जाहीर केली.

पोलिसांनी चिमुकलीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिचा मृतदेह 4 डिसेंबरला सकाळी 11 च्या दरम्यान वसईतील वसई फाटा येथील जिल्हा परिषदेच्या मागील एका चाळीत आढळून आला. या चाळीतील पाच नंबरच्या बंद घरातील मोरीत चिमुकलीचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत पाय बांधलेल्या अवस्थेत आणि कुजलेल्या अवस्थेत मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. चिमुकलीचा मृत्यू गळा दाबून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime : पालकांनो मुलं सांभाळा; नवी मुंबईतून 48 तासांत 6 मुलं बेपत्ता!

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असताना त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांची चौकशी केली असताना चिमुकलीच्या हत्येचा उलगडा झाला. आरोपी मुलाच्या वडिलांनी पोलिसांनी सांगितले की, मृत मुलगी माझ्या मुलाला शेंबड्या शेंबड्या चिडवत होती. त्यामुळे रागाच्या भरात मुलाने 1 डिसेंबरला तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने मला या घटनेबद्दल सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलाच्या वडिलांनी घटना लपवण्यासाठी आधी चिमुकलीचा मृतदेह बंद खोलीत ठेवला आणि ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होते. मात्र आम्ही त्यांना अटक केली असून सध्या अल्पवयीन आरोपी मुलगा जालना येथे सापडला असल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -