घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"तु बाहेर भेट डोक्यात दगड घालतो"; शिक्षकांची मुख्याध्यापकाला धमकी

“तु बाहेर भेट डोक्यात दगड घालतो”; शिक्षकांची मुख्याध्यापकाला धमकी

Subscribe

अकोले : तालुक्यातील एकदरे आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने तुम्ही आदेश पाळत नाही असे शिक्षकांना विचारले असता आश्रमशाळेतील चार शिक्षकांनी संबंधित मुख्याध्यापकास शिवीगाळ करत तुम्ही बाहेर भेटल्यावर डोक्यात दगड घालतो, अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी मुख्याध्यापक विक्रम सुधाकर आरोटे (वय ४०) यांनी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चार शिक्षकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. आसाराम शंकर कानकाटे, संदीप भास्कर कोटकर, जालिंदर निवृत्ती कराळे, अरुण रामदास सोनवणे अशी गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, शाळेचे कामकाज तुम्ही का करत नाही, तुम्ही आदेश पाळत नाही व नोटीस दिली ती घेत नाह, याची विचारणा मुख्याध्यापक विक्रम आरोटे यांनी शिक्षकांना केली. राग मनात धरून एकदरे आश्रम शाळेतील शिक्षक आसाराम शंकर कानकाटे, संदीप भास्कर कोटकर, जालिंदर निवृत्ती कराळे, अरुण रामदास सोनवणे यांनी मुख्याध्यापक विक्रम सुधाकर आरोटे यास शिवीगाळ करुत तुम्ही बाहेर भेटल्यावर तुमच्या डोक्यात दगड घालतो, अशी धमकी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -