घरक्राइमबुरखा घालून सराफांना लुटायच्या; नाशिकमधून केली अटक

बुरखा घालून सराफांना लुटायच्या; नाशिकमधून केली अटक

Subscribe

ठाण्यातील ज्वेलर्स दुकानात चोऱ्या करणाऱ्या बुरखाधारी महिला टोळीला ठाणे नगर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून अटक केली आहे. या टोळीजवळून चोरीला गेलेला ३ तोळ्याच्या सोन्याचा हार हस्तगत करण्यात आला आहे. नसरी शेख, नाझीया शेख आणि अनु बशीर अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील्या व्यक्तींची नावं आहेत.

२५ ते ४० वयोगटातील या तिन्हीजणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे राहणाऱ्या असून एकमेकींच्या नातेवाईक आहेत. लॉकडाऊन शिथिल होताच या तिघी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ज्वेलर्स दुकानात बुरखे परिधान करून खरेदीच्या निमित्ताने येत असे आणि ज्वेलर्स दुकानातील कर्मचारी आणि मालकाचे लक्ष विचलित करून दागिने चोरी करून पसार होत. ठाण्यातील जांभळी नाका येथे असणाऱ्या सोळंखी ज्वेलर्स या दुकानात ३० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास या तिघी बुरखा परिधान करून सोने खरेदी करण्याच्या निमित्ताने आलेल्या होत्या. तिघींची तीन गळ्यातील हार, बांगड्या काढण्यास सांगून दोघींनी दुकानदाराला बोलण्यास गुंतवले व एकीने ३ तोळ्याचा गळयातील सोन्याचा हार बुरख्यात लपवून काही वेळाने तेथून निघून गेल्या.

- Advertisement -

या तिघी गेल्यानंतर सोन्याचा हार गायब झाल्याचे दुकानदारांच्या लक्षात येताच दुकानदाराने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हा हार तिघींनि चोरी केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. याप्रकरणी दुकानदाराने ठाणे नगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तिघीविरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला असता या तिघी एका रिक्षातून जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या रिक्षाचा शोध घेऊन रिक्षा चालकाकडे चौकशी केली असता या तिघींना त्याने जेल तलाव येथे सोडल्याचे सांगितले. ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते व पोलीस हवालदार पोळ, शिंदे, अंबुरे, सोनावणे, मुंडे, पोतदार या पथकाने तांत्रिकदृष्टा तपास करून या तिघींचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यामार्फत तिघींची माहिती काढून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इस्लामपूरा येथून तिघींचे अटक करून ठाण्यात आणून तिघीही कसून चौकशी केली असता तिघींची गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला सोन्याचा हार पोलिसांना परत केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -