भयंकर! दारूच्या नशेत असताना बापाला मारायला हातात घेतला चाकू पण…

मद्यधुंद मुलाने घरातील चाकू उचलून आपल्या वडिलांवरच वार करण्याचा केला प्रयत्न

murder
प्रातिनिधीक फोटो

बऱ्याच जणांना दारू, सिगारेट अशाप्रकारच्या सवयींचे व्यसन असते. मात्र हे व्यसन चांगलंच महागात पडू शकतं, याचं एक धक्कादायक उदाहरण जळगावमधून समोर आलं आहे. दारू पिल्याने आपल्या वडिलांनी जाब विचारले असता, याचा राग मनात ठेवून मद्यधुंद मुलाने घरातील चाकू उचलून आपल्या वडिलांवरच वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र याप्रकारात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चाकू मुलाच्या हातून हिसकावताना मुलाच्याच पोटात तो चाकू घुसला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव येथील बालाजी पेठेत शुक्रवारी घडली. २६ वर्षीय नशेत असणाऱ्या मुलाचे नाव सौरभ वर्मा असे असल्याची माहिती मिळतेय. तर या मुलाचे वडील संतोष वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

असा घडला प्रकार

जळगाव शहरातील राम पेठेतील बालाजी मंदिर परिसरात दारूड्या मुलासोबत झालेल्या भांडणात धक्कादायक प्रकार घडला. या भांडणात बापाकडूनच चाकूने भोसकून खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष वर्मा हे सोन्या-चांदीचे व्यापारी आहेत. शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या बालाजी पेठेत ते वास्तव्यास होते. त्याच्या मुलगा सौरभ दरोरोज दारू पिऊन घरी यायचा आणि घरात वाद घालायचा. शुक्रवारी रात्री १० वाजता सौरभ दारू पिऊन घरू आल्यानंतर वडिलांनी त्याला रोकले आणि खडसवले. याचा सौरभला राग आला आणि राग अनावर झाल्याने त्याने मोठ मोठ्याने वडिलांसह वाद घातला. यावेळी त्याने चाकू हातात घेत वडिलांनाच धमकावले. मात्र दारूच्या नशेत असणाऱ्या मुलाच्या हातून चाकू काढून घेताना तो वडिलांच्याच अंगावर धावून निघाला. यावेळीच वडिलांच्या हातातला चाकू सौरभच्या थेट पोटात घुसला. त्यात तो गंभीर जखमी झाला. वडिलांनी सौरभला खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्या रात्रीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मृत घोषीत केले.