Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक: लाटण्याने मारून बायकोने केली नवऱ्याची हत्या, प्रियकराने दिली साथ

धक्कादायक: लाटण्याने मारून बायकोने केली नवऱ्याची हत्या, प्रियकराने दिली साथ

घराला टाळे लावून रेखा आणि तिचा प्रियकर फरार झाले होते.

Related Story

- Advertisement -

विवाहबाह्य संबंधातून अनेक विचित्र घटना घडत असतात. हरियाणामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील बंदेपुर गावातील एक बायकोने नवऱ्याची लाटण्याने मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येत बायकोला तिच्या प्रियकराने साथ दिली.

हरियाच्या सोनीपत येथे राहणारा मृत नरेंद्र राठधना हा गॅस ऐजंसीमध्ये काम करत होता. २२ वर्षांपूर्वी त्याचा रेखा हिच्याशी विवाह झाला. त्यांना दोन मुलेही होती. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले जात आहे. एक वर्षापूर्वी रेखा ही आपल्या प्रियकारासोबत पळून गेली होती. तीन महिन्यांपूर्वीच ती नवऱ्याकडे परत आली होती. ती परत आल्यापासून दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली होती. त्याच्या वादावरून गावात पंचायतही भरवण्यात आली. गावातील लोकांनी समजवल्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

मृताच्या भावाने सांगितल्याप्रमाणे, त्याला अचानक भावाच्या नंबर वरून फोन आला. ‘तुझ्या भावाचं काम आम्ही तमाम केले आहे’ असा फोन भावाला आला. त्याची वहिनी रेखा आणि तिचा प्रियकर या दोघांनी भावाची हत्या केली असे त्यांनी सांगितले. फोन येताच भाव नातेवाईकांना घेऊन नरेंद्रच्या घरी पोहचला. घराला टाळे लावून रेखा आणि तिचा प्रियकर फरार झाले होते. नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आत जाताच नरेंद्र रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडला होता. बायकोने आणि तिच्या प्रियकाराने लाटण्याने ठेचून त्याची हत्या केली होती. त्याचा चेहरा कपड्याने बांधण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या भावाला त्याच्या वहिनीचा फोन आला की, तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून भावाची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. घटनेची चौकशी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या बायकोला आणि तिच्या प्रियकराचा शोध पोलीस घेत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक: तरुणाची हत्या करून वीट भट्टीत टाकला मृतदेह

- Advertisement -