Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पतीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेवर पत्नीचा कोयत्याने हल्ला

पतीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेवर पत्नीचा कोयत्याने हल्ला

Related Story

- Advertisement -

पतीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेला पत्नीने भररस्त्यात गाठून तिच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण पश्चिम येथे उघडकीस आली. या हल्लात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर कल्याणच्या रुख्मिणी बाई रुग्णलयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी ४२ वर्षीय पत्नीला अटक केली आहे.

प्रिया जाधव असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. प्रिया ही पती शिवदास जाधव सह कल्याणच्या आंबिवलीतील अटाळी गावात राहण्यास आहे. प्रिया ही आपल्या पतीवर नेहमी संशय घेत असे, आपल्या पतीचे कल्याण परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रियाला होता. संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या प्रिया ही पतीसोबत या कारणावरून नेहमी वाद घालत होती.

- Advertisement -

अखेर या वादाचा शेवट करण्याच्या इराद्याने प्रियाने बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कल्याण परिसरात राहणाऱ्या महिलेला कल्याण रेल्वे स्थानकाजवळील कोन गाव रिक्षा स्टँड येथे गाठले, व तिच्यावर भररस्त्यात कोयत्याने हल्ला करून करून प्रियाने तेथून पळ काढला. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे.

जखमी महिलेच्या जबानीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी प्रिया जाधव हिच्याविरोधात गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे.

- Advertisement -