घरक्राइमधक्कादायक; वाढदिवसाचे आमंत्रण देऊन मित्राने केला तिच्यासमोर नग्न डान्स!

धक्कादायक; वाढदिवसाचे आमंत्रण देऊन मित्राने केला तिच्यासमोर नग्न डान्स!

Subscribe

पार्टी चालू असताना अचानक मोठ्याने गाणी लावून तिघांनी आपले कपडे उतरवून विविस्त्र अवस्थेत डान्स करायला सुरूवात केली.

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मैत्रीणीला आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्रांनी मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन मित्रांनी मिळून मैत्रिणी समोर आपले कपडे उतरवून विवस्त्र अवस्थेत डान्स करायला सुरूवात केली. पुण्याच्या साळुंके विहारमधील ग्राफीकॉन सोसायटीमध्ये हा किळसवाणा प्रकार घडला आहे.

तिनही गुन्हेगार हे पिडीत महिलीच्या ओळखीचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची मैत्री असल्याचे समजते. त्यातील एका मित्राचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पार्टीसाठी आपल्या मैत्रिणीला पार्टीसाठी बोलावले. पार्टी चालू असताना अचानक मोठ्याने गाणी लावून तिघांनी आपले कपडे उतरवून विविस्त्र अवस्थेत डान्स करायला सुरूवात केली. त्यांनी पीडित महिलेला त्रास द्यायला सुरूवात केली. तिच्या अंगाशी घाणेरडे चाळे करून तिला शिवीगाळही करू लागले. तिच्यावर बलात्कार करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

- Advertisement -

या घटनेनंतर पीडित महिलेला मानसिक धक्का बसला. महिनाभर ती घराच्या बाहेरही पडली नाही. मानसिक धक्क्यातून बाहेर येताच तिने पोलिसांत तिघांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार गंभीररित्या घेऊन त्वरित आरोपींचा शोध घ्यायाला सुरूवात केली. त्यातील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या विचित्र घटनेमुळे पीडित मुलीला मानसिकदृष्ट्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  तिच्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींनाही मोठा धक्का बसला आहे.


हेही वाचा – जुगार खेळणाऱ्या महिलांच्या टोळीवर छापा,३८ हजारांचा माल जप्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -