घरक्राइमम्हाडाचे घर देते सांगून दोन महिलांनी केली महिलेची २५ लाखांची फसवणुक

म्हाडाचे घर देते सांगून दोन महिलांनी केली महिलेची २५ लाखांची फसवणुक

Subscribe

जोगेश्वरीतील घटना; महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

म्हाडाचे घर देते असे सांगून एका महिलेची सुमारे २५ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्ना आनंद भराटे आणि रोशा प्रमोद दास या दोन महिलांविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे, या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणाला अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हसिमुनिसा हबीब शेख ही महिला जोगेश्वरीतील प्रेमनगर परिसरात राहत असून तिचा पती चालक म्हणून काम करतो तर एक मुलगी विवाहीत आहे.

काही वर्षांपूर्वी तिचा जावई सलीम खान याने तिची रत्ना आणि रोशा यांच्याशी ओळख करुन दिली होती. म्हाडामध्ये आपली ओळख आहे, त्यांना म्हाडाचे स्वस्तात घर मिळवून देते असे सांगून या दोघींनी तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर म्हाडाच्या घरासाठी त्यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. ही रक्कम घेतल्यांनतर त्यांनी टप्याटप्याने आणखीन काही पैसे घेतले. अशा प्रकारे या दोघींनी घरासाठी तिच्याकडून २५ लाख ५० हजार रुपये घेतले. काही महिन्यांपूर्वी तिला मालाड येथील मालवणीतील म्हाडाचे एक घर दाखविण्यात आले होते. या इमारतीमध्ये एक फ्लॅट तिला अ‍ॅलोट झाले असून या फ्लॅटचे बोगस कागदपत्रे बनवून या दोघींनी तिला दिले होते. मात्र त्यांनी दिलेले कागदपत्रे बोगस असल्याचे नंतर तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने त्यांच्याकडे तिच्या पैशांची मागणी सुरु केली होती, तिने पैसे देण्यास टोलवाटोलवी केल्यानंतर हसिमुनिसा शेख हिने मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रत्ना आणि रोशा या दोघींविरुद्ध पोलिसांनी 420, 467, 468, 471, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघींना या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – विलेपार्ले गझाली फायरिंगप्रकरण: रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -