घरक्राइमकुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; मुंबई महिलांसाठी सुरक्षित की असुरक्षित?

कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; मुंबई महिलांसाठी सुरक्षित की असुरक्षित?

Subscribe

मुंबई : महिलांसाठी मुंबई ही सर्वात सुरक्षित शहर मानले जाते. पण याच मुंबईमध्ये रविवारी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या मृत महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कुर्ला पोलीस ठाण्यात एक संशयीत सुटकेस आढळून आल्याचा फोन आला. ही सुटकेस सी. एस. टी. रोड शांतीनगर समोरील मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरेकेटच्या आतील बाजूला होती. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी सुटकेसची तपासणी केल्यानंतर त्यात एका महिलेचा मृतदेह मिळाला. यानंतर पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तापस पोलीस करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – बलात्काराच्या 97 टक्के घटनांमध्ये नराधम असतो परिचयातीलच; NCRB च्या अहवालातून माहिती उघड

या मृत महिलेचे वय 35 ते 40 वर्षाच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले असून या महिलेने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट परिधान केली होती. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलीय महिलेची ओळख पटवण्याचे प्राथमिक आव्हान असून मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणती महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे का? त्याचबरोबर महिलेच्या फोटोमार्फत तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच सुटकेस ज्या परिसरात सापडली. तेथील सीसीटीव्ही देखील पोलीस तपासणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईत तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोन नराधमांना अटक

महिला मुंबईत असुरक्षित?

महिला, मुलींसाठी मुंबई असुरक्षित असल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटकसुद्धा केली आहे. या घटनेतील आरोपी हे पीडितेच्या परिचयातीलच असल्याची माहिती समोर आली आहे. तर एनसीआरबीच्या एका अहवालातून बलात्काराच्या एकुण घटनांपैकी 97 टक्के घटनांमधील आरोपी हे पीडितेच्या परिचयातीलच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -