घरक्राइमBKC येथे आढळला महिलेचा मृतदेह; लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय

BKC येथे आढळला महिलेचा मृतदेह; लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय

Subscribe

कुर्ला वांद्रे संकूल येथील एमटीएनएल कार्यालयाजवळ मंगळवारी रात्री एका महिलेचा मृतदेह बीकेसी पोलिसांना आढळून आला आहे. या महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर मृत महिलेची ओळख पटलेली असून ही महिला कुर्ला पश्चिम परिसरात राहण्यास होती.

BKC येथील एमटीएनएल कार्यालयाजवळ महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. या महिलेवर लैगिंग अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर मृत महिलेची ओळख पटलेली असून मृत महिला ही देहविक्री करणारी होती. याला पतीचा विरोध होता अशी माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

ग्राहकाकडून पैशाच्या कारणावरून वाद होऊन तीची हत्या करण्यात आली असावी अथवा असा संशय पोलिसांना आहे. तसंच तिच्या पतीवर देखील पोलिसांनी संशय व्यक्त केला असून पतीला चौकशीसाठी बिकेसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बीकेसी पोलिसांकडून कुर्ला ते बीकेसी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध लैगिंग अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत मागील ४८ तासात पाच जणांच्या हत्या झालेल्या आहेत, कांदिवली, शिवाजी नगर, सांताक्रूझ आणि बीकेसी येथे या हत्या झाल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -