Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! पतीची नोकरी मिळावी म्हणून पत्नीनं केलं ठार

धक्कादायक! पतीची नोकरी मिळावी म्हणून पत्नीनं केलं ठार

Related Story

- Advertisement -

पतीची नोकरी मिळावी म्हणून पत्नीने पतीला ठार करण्यासाठी सुपारी दिल्याची घटना फिरोजाबाद येथे घडली. आरोपींनी तिच्या पतीची हत्या करत मृतदेह कोणाला मिळू नये यासाठी जमिनीत गाढला. पत्नीने चालाखी करत पोलिसांनी संशय येऊ नये यासाठी पती हरवल्याची तक्रार केली.

नरखी खेड्यातील रहिवासी अवधेश पुत्र बाबू बरेलीतील कुंवर ठाकूर लाल इंटर कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते. घरातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षापूर्वी त्यांचे लग्न खेरा येथे राहणाऱ्या विनिताशी झालं होतं. तो पत्नी आणि मुलासमवेत बरेलीच्या कर्मचारी नगरात राहत होता. त्याची मेव्हणीसुद्धा गेल्या चार महिन्यांपासून त्याच्याबरोबर राहत होती. अवधेशच्या पत्नीने पतीची नोकरी मिळण्यासाठी नवऱ्याला ठार केलं.

- Advertisement -

एसपी मुकेश चंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीने शार्पशूटर शेरसिंहला तिच्या पतीला ठार करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली. गुंड शेरसिंह उर्फ ​​चिकू अवधेशला मारण्यासाठी १२ ऑक्टोबरला हत्या केली. त्याचा मृतदेह नरखी पोलीस स्टेशन परिसरात गाढला होता. एसपी मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, हत्या करणारा आरोपी चोरीच्या आरोपाखाली पकडला गेला. त्याच्या चौकशी केली असता त्याने एकाला ठार करुन बरेली येथे त्याचा मृतदेह गाढला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शेतातून सांगाडे जप्त केले आहेत. पोलिसांनी हा सांगाडा पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. मृत अवधेशची पत्नी आणि सासरचे लोक फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

- Advertisement -