घरक्राइमधक्कादायक, जेलमध्ये तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

धक्कादायक, जेलमध्ये तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

Subscribe

पिडीत तरुणाला काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड जेलमध्ये आहे. रविवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास त्याचा सहकारी आरोपी मोहम्मद इर्शादने त्याला बेदम मारहाण केली.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका 20 वर्षांच्या तरुणावर त्याच्याच कोठडीतील आरोपीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना आर्थर रोड जेलमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन मोहम्मद इर्शाद इस्लाम शेख या 19 वर्षांच्या आरोपी तरुणावर ना. म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. लवकरच लोकल कोर्टातून ताबा घेऊन त्याला अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पिडीत तरुणाला काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड जेलमध्ये आहे. रविवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास त्याचा सहकारी आरोपी मोहम्मद इर्शादने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. भीतीपोटी त्याने ही माहिती कोणालाही सांगितली नाही. सकाळी त्याने हा प्रकार जेल कर्मचार्‍यांना सांगितला. या घटनेने त्यांना धक्काच बसला. त्यानंतर जेलच्या अधिक्षकांनी ही माहिती ना. म. जोशी मार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रोहित साळी, पर्यवेक्षक कांबळे यांनी आर्थर रोड जेलमध्ये धाव घेतली होती. पिडीत तरुणाची चौकशी केल्यानंतर त्याने रात्री घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मोहम्मद इर्शाद इस्लाम शेखविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह मारहाण करणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

- Advertisement -

मोहम्मद इर्शाद हा गोवंडीतील गौतमनगरचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध एका गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलीस कोठडीनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याला आर्थर रोड जेलमध्ये पाठविण्यात आले होते. या  घटनेने जेल प्रशासनासह इतर आरोपींमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याच जेलमध्ये काही राजकीय नेत्यासह अंडरवर्ल्डशी संबंधित काही कुख्यात गुंड आणि इतर गुन्ह्यांतील आरोपी आहेत. त्यामुळे आगामी काळात अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून जेलमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस जास्तीत जास्त गस्त घालण्याचे आदेश संबंधित कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -