जनतेच्या पैशावर ‘पंजा’ पडू देणार नाही- मोदी

'मै भी चौकीदा' व्हिडिओ कॉन्फरन्समधून भाजप कार्यकर्ते, व्यापारी, शेतकऱ्यांशी मोदींनी साधला संवाद.

MODI
मो 'मै भी चौकीदार' व्हिडिओ कॉफ्नरंसिंग

‘मै भी चौकीदार’ व्हिडिओ कॉन्फरन्समधून भाजप कार्यकर्ते, व्यापारी, शेतकऱ्यांशी मोदींनी संवाद साधला आहे. प्रत्येक शिकलेला, अशिक्षित, व्यापरी, विद्यार्थी चौकीदार आहे. चौकीदार एक ताकद असून, देशाच्या जनतेला चौकीदार आवडतो. देशाच्या जनतेने पुन्हा एकदा आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी द्यावी असे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींग संवाध साधतांना सांगितले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी लोकांसाठी नवीन होतो, माझी मुख्यमंत्री म्हणून एक ओळख होती, मात्र विरोधकांनीच माझा अधिक प्रचार केल्याच ते म्हणाले. मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुनम महाजन देखील यावेळी या व्हिडिओकॉन्फरन्सींगला मुंबईतून जोडले गेले होते.

मुंबईच्या तरुणाचा प्रश्न

दिल्लीच्या ताकलटोरा मैदानातून मोदी संवाध साधत असताना देशभरातून भाजप कार्यकर्ते यावेळी त्यांच्याशी जोडले गेले होते. यावेळी मुंबईतील एका तरुणाने पाकिस्तानच्या बालाकोट एअरस्ट्राइकच्या निर्णयावर विचारले असता, माझ्या साठी देश महत्वाचा असल्याचे मोदींनी सांगितले. एअर स्ट्राइकचे संपूर्ण श्रेय हे जवानांचे असून मला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला, उरी येथे जवानांवर हल्ला केला, त्यामुळे दहशतवाद्यांचे मुळच उधवस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या राजकीय कारकीर्दी पेक्षा आणि राजकारणा पेक्षा मला देश महत्वाचा असून, देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याचे यावेळी बालाकोट एअर स्टाइकवर बोलताना मोदी म्हणाले.

चौकीदाराच्या रुपात जबाबदारी

देशाने २०१४ साली मला निवडून दिले आणि माझ्यावर देशाच्या चौकीदारीची जबाबदारी दिली. जनतेच्या पैशावर पंजा पडून देणार नाही, चौकीदार बनून देश सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. माझ्यासह देशातील प्रत्यक नागरिक चौकीदार आहे, चौकीदार एक भावना आहे, चौकीदार एक व्यवस्था आहे, चौकीदारीला कोणतेही बंधन आणि गणवेश नसल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. देशाची आज जगात एक वेगळी ओळख आहे, हे केवळ माझ्या मुळे नाही तर सव्वाशे करोड जनतेमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.