घर देश-विदेश ₹ 2000 Note : नोटबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा, ठाकरे गटाची...

₹ 2000 Note : नोटबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा, ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) पहिल्या वेळी ज्या ‘उदात्त भावने’ने नोटाबंदी (Demonetisation) लादली, तोच प्रकार आता आहे. विरोधी पक्षांकडे 2024च्या दृष्टीने थोडेबहुत दोन हजारांच्या नोटांचे (₹ 2000 Note) चलन राखून ठेवले असेल तर, ते बाद व्हावे व विरोधी पक्ष त्यादृष्टीने अडचणीत यावा, यापेक्षा दुसरा हेतू असू शकत नाही. दोन हजारांची नोटबंदी ही लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections 2024) पहिली घंटा आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सामान्य जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही. सर्व राष्ट्रीय कामे बाजूला ठेवून पंतप्रधान कर्नाटकच्या निवडणुका, सभा व रोड शो घेतात व शेवटी त्यांचा पराभव होतो. त्या पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत दोन हजारांची नोटाबंदी जाहीर केली जाते, पण त्यांच्या निर्णयाने यावेळी ना खळबळ माजली, ना सळसळ झाली. कर्नाटकच्या निवडणुकीत (Karnataka Assembly election, 2023) सत्ताधाऱ्यांकडून दोन हजारांच्या गुलाबी नोटांचा अफाट वापर झाला, पण दोन हजारांची मात्रा चालली नाही. त्या चिडीतूनही ‘दोन हजारांची नोट बाद’ असा निर्णय झालेला असू शकतो, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुखपत्र ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखातून केली आहे.

- Advertisement -

आता मोदींनी ‘लहर’ आली म्हणून दोन हजारांची नोटही बाद केली. हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला. आपल्या देशातील न्यायालये, घटनात्मक संस्था, निवडणूक आयोग जेथे स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिले नाहीत, तेथे ‘भारताची रिझर्व्ह बँक’ दोन हजारांच्या नोटांबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकेल काय? दोन हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे.

देशाच्या चलनात दोन हजारांच्या नोटा किती आहेत व लोकांनी त्यातील किती दडवून ठेवल्या आहेत? हे एक रहस्य आहे. या सर्व नोटा सप्टेंबरपर्यंत बाहेर काढायच्या आहेत. बँकेत एकावेळी फक्त 20 हजारांपर्यंतच या गुलाबी नोटा जमा करता येतील. मोदी यांचे अंधभक्त म्हणजे एक अजबच रसायन म्हणावे लागेल. एक हजाराची नोट बाद करून दोन हजारांची नोट चालू करणे हा एक मास्टर स्ट्रोक होता व आता दोन हजारांची नोट अचानक बंद करणे हासुद्धा अंधभक्तांसाठी मोदींचा मास्टर स्ट्रोकच आहे. असे ढोंग व दुटप्पीपणा फक्त हे अंधभक्तच करू शकतात, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -