घरदेश-विदेशआजचा विजय राहूल गांधीच्या अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीचे गिफ्ट

आजचा विजय राहूल गांधीच्या अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीचे गिफ्ट

Subscribe

देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पाच पैकी तीन राज्यात काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारलेली आहे. राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्र स्वीकारून बरोबर एक वर्ष होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा विजय त्यांना वर्षपूर्तीचे गिफ्ट असल्याचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट म्हणाले आहेत. राहूल गांधी यांनी डिसेंबर २०१७ साली अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.

- Advertisement -

राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यात निवडणुका झाल्या होत्या. काँग्रेसला निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले होते, मात्र सत्ता स्थापन करण्याइतका जागा मिळवता आल्या नव्हत्या. मात्र आता एक वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन राज्यात काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे.

राहूल गांधी नवे बाहुबली – सिद्धू

- Advertisement -

एकाबाजुला सचिन पायलट यांनी विजयाचे श्रेय राहुल गांधी यांना दिले आहे. तर दुसऱ्या बाजुला पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांनी राहूल गांधी हे नवे बाहुबली असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, “लोकशाहीमध्ये लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो. लोकांचा आवाज हा प्रत्यक्ष देवाचा आवाज असतो. हाच आवाज आता भाजपसाठी डोकेदुखी ठरत असून राहूल गांधी यामध्ये नवे बाहुबली म्हणून समोर येत आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -