घरट्रेंडिंगलेस्बियन जोडीचा व्हिडिओ टिक-टॉकनं केला डिलीट!

लेस्बियन जोडीचा व्हिडिओ टिक-टॉकनं केला डिलीट!

Subscribe

अमेरिकेतील एका लेस्बियन जोडीनं टिक-टॉकनं त्यांचा व्हिडिओ डिलीट केल्यामुळे ट्विटवर त्यांना झापलं. होमोफोबिआ खरं आहे असं त्या म्हणाल्या.

अनेक देशात जरीही LGBTQ समाजातील लोकांना स्वीकारले जात असले तर अजूनही या समाजातील लोकांना एका वेगळ्या नजरेने बघितले जाते. या समाजातील लोकं जरी सामान्य असली तरी ते वेगळे आहेत अशा पध्दतीने त्यांच्याकडे पाहिले जाते. मध्यंतरी ट्विरटरवरती एका लेस्बियन म्हणजेच समलिंगी जोडीचे फोटोशुट फार व्हायरल झाले होते. या मुलींचे नाव सुंदस मलिक आणि अंजली चक्रा असं आहे आणि त्या दोघी अमेरिकेत राहतात. आता पुन्हा एकदा या दोघी व्हायरल झाल्या आहेत मात्र त्या मागिल कारण काही आनंदाचं नाही. या दोघी अनेक वेळा एकमेकांचे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक टिक-टॉक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता मात्र ‘it violates community guidelines’ म्हणजेच टिक-टॉकनं दिलेल्या निर्बंधाचा उल्लंघन करणारा हा व्हिडिओ आहे असं म्हणत टिक-टॉकनं तो व्हिडिओ काढला.

- Advertisement -

तर अंजलीनं ही गोष्ट आपल्या ट्विटरवर, ‘होमोफोबिया बद्दलची अफवा खरी असते’ असं म्हणत पोस्ट टाकले आणि टिक-टॉकला मेन्शन करून व्हिडिओ काढण्यामागचे कारण विचारले. या व्हिडिओत दोघी आधी पजामा घालून आणि नंतर लेहेंगा घालून डांस करताना दिसत आहेत. तर या घटनेनंतर नेटकऱ्यांनी टिक-टॉकची फार टिका केली आणि अंजली आणि सुंदसला पाठिंबा दिला.

अशा प्रकारे नेटकऱ्यांनी टिक-टॉकची टिका केलीः

- Advertisement -

या पोस्टला अनेक लाईक्स आणि रिट्विट केले गेले. सुंदस मलिक पाकिस्तानातील एक कलाकार आणि भारतातली अंजली चक्रा या दोघी या वर्षाच्या सुरुवातीला व्हायरल झाल्या होत्या. पावसात एका ट्रान्सपरंट छत्री खाली उभं राहून केलेला त्यांचा एक फोटोशूट ट्विटरवर व्हायरल झाला होता.


हेही वाचाः सूड हा कधीही न्याय होऊ शकत नाही – सरन्यायाधीश शरद बोबडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -