घर देश-विदेश मेक्सिकोत सापडला 1 हजार वर्ष जुना Alien ममी; दाव्यानं खळबळ

मेक्सिकोत सापडला 1 हजार वर्ष जुना Alien ममी; दाव्यानं खळबळ

Subscribe

मंगळवारी मेक्सिकन संसदेत एलियन्सच्या उपस्थितीवर चर्चा झाली. यावेळी दोन मृतदेहही दाखवण्यात आले. हे मृतदेह एलियन्सचे असल्याचा दावा केला जात आहे. मेक्सिकन पत्रकार आणि युफोलॉजिस्ट जैमे मोसन यांनी सांगितले की, हे मृतदेह पेरूमधील एका खाणीत सापडले आहेत, जे सुमारे 1 हजार वर्षे जुने आहेत.

मंगळवारी मेक्सिकन संसदेत एलियन्सच्या उपस्थितीवर चर्चा झाली. यावेळी दोन ममी दाखवण्यात आले. हे ममी एलियन्सचे असल्याचा दावा केला जात आहे. मेक्सिकन पत्रकार आणि युफोलॉजिस्ट जैमे मोसन यांनी सांगितले की, हे मृतदेह पेरूमधील एका खाणीत सापडले आहेत, जे सुमारे 1 हजार वर्षे जुने आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संसदेत करण्यात आले. (1 000 year old alien body found in Mexico Excited by the claim America NASA )

ममीफाईड एलियन्सचे ममी लाकडी खोक्यात ठेवण्यात आले होते. त्याचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. या सुनावणीवेळी अमेरिकन नौदलाचा माजी पायलट रायन ग्रेव्हजही उपस्थित होता. ग्रेव्हज यांनी स्वत: अमेरिकन संसदेत दावा केला होता की त्यांनी त्यांच्या सेवेदरम्यान एलियन स्पेसक्राफ्ट पाहिले होते.

- Advertisement -

मेक्सिकन संसदेत या मुद्द्यावर झालेल्या चर्चेदरम्यान हार्वर्डच्या खगोलशास्त्र विभागातील एका प्राध्यापकाने सरकारकडे एलियन्सवरील अभ्यासाला मान्यता देण्याची मागणी केली.

पत्रकार मोसन यांनी सांगितले की, मेक्सिकोच्या स्वायत्त विद्यापीठात नुकताच UFO नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. येथे शास्त्रज्ञांनी रेडिओकार्बन डेटिंगद्वारे डीएनएचे विश्लेषण केले. यापूर्वी जुलैमध्ये अमेरिकन संसदेतही एलियन्सबाबत चर्चा झाली होती.

- Advertisement -

यावेळी, यूएस नेव्हीचे माजी गुप्तचर अधिकारी सेवानिवृत्त मेजर डेव्हिड ग्रुश यांनी दावा केला होता की अमेरिका अनेक वर्षांपासून यूएफओ आणि एलियनशी संबंधित माहिती लपवत आहे. अमेरिका या यूएफओच्या रिव्हर्स इंजिनीअरिंगवर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी अमेरिकन नेव्ही ऑफिसरचा दावा – 1930 मध्ये एलियनचे ममी सापडले

द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, मेजर ग्रश 2022 च्या अखेरीपर्यंत यूएस संरक्षण एजन्सीसाठी यूएपी (यूएफओशी संबंधित संशयास्पद घटना) चे विश्लेषण करत होते. सुनावणीत त्यांनी सांगितले होते की सरकारला एलियन सापडले आहेत आणि ते त्यांच्या अंतराळ यानावर गुप्त संशोधन करत आहेत.

ग्रुश म्हणाले की , त्यांनी क्रॅश झालेल्या UFOs वर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधन आणि रिव्हर्स इंजिनीअरिंग प्रोग्रामबद्दल शिकले होते. मात्र, त्यांना हा कार्यक्रम पाहण्याची परवानगी नव्हती. अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागॉनने हे दावे फेटाळले होते. पेंटागॉनने म्हटले आहे की अमेरिकेने एलियनशी संबंधित कोणताही कार्यक्रम कधीच चालवला नाही आणि आताही असे काही घडत नाही.

ग्रश यांनी संसदेत असाही दावा केला होता की, 1930 मध्ये दुसऱ्या ग्रहावरील अंतराळयान अपघातात सापडले होते. सोबत एक शरीरही होतं, ते माणसाचं नव्हतं. या कार्यक्रमात थेट सहभागी असलेल्या अमेरिकन अधिकाऱ्यांमार्फत आपल्याला ही माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. अमेरिकन सरकार 1930 पासून हा कार्यक्रम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा: वीर जवानांच्या मृत्यूचे सावट सरकारच्या चेहऱ्यावर दिसले नाही; ठाकरे गटाचा केंद्रावर हल्लाबोल )

- Advertisment -