घरअर्थजगतधक्कादायक! जगभरात १.३७ लाख कर्मचाऱ्यांना नारळ, 'या' क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात

धक्कादायक! जगभरात १.३७ लाख कर्मचाऱ्यांना नारळ, ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात

Subscribe

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटनेही १० हजार कामचुकार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दि इन्फॉर्मेशच्या अहवालानुसार, गुगलच्या योजनांमध्ये सुधार करण्याकरता कामचुकार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येत आहे.

नवी दिल्ली – देशभरातील टेक कंपन्यांनी (Tech Companies) कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. मेटा (Meta), अॅमेझॉन (Amazon), एचपी (HP) आणि ट्विटरसारख्या (Twitter) मोठ्या कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नारळ (Cut Off) दिला आहे. देशभरातील तब्बल ८५३ टेक कंपन्यांनी जवळपास १ लाख ३७ हजार ४९२ कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर, उत्तर भागातील देशांमध्ये मंदीचं (Global Recession) सावट पसरलं आहे. जागतिक मंदीच्या लाटेत टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याने येत्या काळात ही कपात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – …तरच भारताचा विकास होईल; अदानी, अंबानी यांचा उल्लेख करत अमिताभ कांत यांचं विधान

- Advertisement -

Layoffs FYI च्या आकडेवारीनुसार, १ हजार ३८८ टेक कंपन्यांनी कोरोना काळापासून २ लाख ३३ हजार ४८३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे. तर, २०२२ मध्ये सर्वाधिक कर्मचारी कपात करण्यात आली आहे. या वर्षाच्या नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत युएस टेक सेक्टरमध्ये मेटा, ट्विटर, सेल्सफोर्स, नेटफ्लिक्स, सिस्को आणि रोकूसारख्या कंपन्यांनी ७२ हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. Crunchbase च्या मते रॉबिनहुड, ग्लोसियर आणि बेटरसारख्या काही टेक कंपन्यांनी २०२२ मध्ये आपल्या कर्मचारी संख्येत मोठ्या प्रमाणात घट केली आहे.

हेही वाचा – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेकॉर्डब्रेक नोंदणी

- Advertisement -

जागतिक मंदीच्या लाटेत फक्त लहान कंपन्यांच नाही तर मोठ्या कंपन्याही वाहून जात आहेत. यामध्ये अॅमेझॉन आणि एचपीसारख्या कंपन्या आहेत. अॅमेझॉनने आतापर्यंत १० हजारपेक्षा जास्त आणि एचपीने सहा हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा राजीनामा घेतला आहे. एवढंच नव्हे तर, २०२३ मध्ये आणखी कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचं अॅमेझॉनचे सीईओ एंडी जेसी यांनी सांगितलं.

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटनेही १० हजार कामचुकार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दि इन्फॉर्मेशच्या अहवालानुसार, गुगलच्या योजनांमध्ये सुधार करण्याकरता कामचुकार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येत आहे.

हेही वाचा – मंदीची चाहूल! अॅमेझॉनसुद्धा करणार सर्वात मोठी नोकर कपात

भारतातही कर्मचारी रडारवर

भारतात जवळपास १६ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळाला आहे. बायजूस (Byjus), अनअॅकॅडमी (Unacademy) आणि वेदांतुसारख्या (Vedantu) ४४ स्टार्टअप्स शैक्षणिक अॅप (Educational Tech App) कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या कंपन्यांचे वेंचर कॅपिटल कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त स्टार्टअपच नव्हे तर युनिकॉर्न कंपन्यांमध्येही कर्मचारी कपातीला सुरुवात झाली आहे. ओला (Ola), कार्स २४ (Cars 24), मिशो (Meesho), लीड (Lead), एमपीएल (MPL), इनोवेकर, उडानसारख्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.

रेजरपेएक्स पॅरोलच्या वार्षिक अहवालानुसार, भारतीय स्टार्टअप गेल्या १२ महिन्यांपासून वाईट परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळे जवळपास ६१ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. पीडब्ल्यूसी इंडियाच्या नवीन अहवालानुसार, जुलै सप्टेंबरच्या काळात भारतात फक्त दोन स्टार्टअप्सना शिपरॉकेट आणि वनकार्डने युनिकॉर्नचा दर्जा दिला आहे.

हेही वाचा – फेसबुकच्या मूळ कंपनीत मोठी कर्मचारी कपात; कमाईतील तूट भरून काढण्यासाठी निर्णय

फ्लिपकार्टही धोक्यात

अॅमेझॉनसारखी ई-कॉमर्स कंपनी धोक्यात आलेली असताना फ्लिपकार्टचीही तीच अवस्था झाली आहे. येत्या १२ ते १८ महिन्यांत कंपनीमध्ये बरीच उलथा-पालथ होऊ शकते, असा इशारा फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ति यांनी दिला आहे.

कोरोना काळात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. याचा परिणाम आता जगावर आर्थिक मंदीचं सावट घोंगावत आहे. यामुळे अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. लॉकडाऊन काळात वर्क होम सुरू असल्याने लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस पुरवणाऱ्या कंपन्यांचं मार्केट उसळलं होतं. मात्र, आता पुन्हा सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचा बाजार उठला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -