घरताज्या घडामोडीकाबुल एअरपोर्टवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार; एका अफगाण सैनिकाचा मृत्यू, तर तीन जखमी

काबुल एअरपोर्टवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार; एका अफगाण सैनिकाचा मृत्यू, तर तीन जखमी

Subscribe

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तिथली परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अफगाणी नागरिक सध्या भीतीच्या छायेखाली वावरत आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने अफगाणी नागरिकांवर भूकबळीचे सावट असल्याचा इशारा दिला आहे. या दरम्यानच आज तालिबानी दहशतीमध्येच काबुल एअरपोर्टवर अफगाण सैन्य आणि अज्ञात हल्लेखोरांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात एका अफगाण सैनिकाचा मृत्यू झाला आहे. याची माहिती एका जर्मन अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

स्पुतनिक न्यूज एजेंसीने जर्मनीच्या सशस्त्र दलांचा हवाला देत असे वृत्त दिले आहे की, ‘या गोळीबारच्या घटनेमध्ये एक अफगाणिस्तानच्या सुरक्ष दलातील सदस्य आणि तीन इतर सदस्य जखमी झाली आहेत. या संघर्षात अमेरिका आणि जर्मनीचे सैन्य सामील होते.’

- Advertisement -

एएफपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जेव्हा अफगाण गार्ड्स आणि अज्ञात हल्लेखोरांमध्ये गोळीबार झाला तेव्हा त्यामध्ये अमेरिका आणि जर्मन सैन्य सामील असल्याचे दिसले. जर्मनी सैन्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संघर्षात एका अफगाणिस्तानच्या सैनिकाचा मृत्यू झाला आहे.

जर्मनी सैन्याने ट्विट करून सांगितले की, ‘काबुल एअरपोर्टच्या नॉर्थ गेटवर आज सकाळी ४.१३ मिनिटांनी अफगान गार्ड्स आणि अज्ञात हल्लेखोरांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.’ अशा परिस्थिती दरम्यानच तालिबानने अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्याकडे शेकडो दहशतवादी तैनात केले आहेत. त्यामुळे सध्या पंजशीर खोरे तालिबान जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तब्बल १०० तालिबानी दहशतवाद्यांना ठार करणारा अफगाण शेरशाह


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -