Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Tamil Nadu Election 2021: AIADMK आमदाराच्या ड्रायव्हरच्याच घरी सापडले १ कोटी

Tamil Nadu Election 2021: AIADMK आमदाराच्या ड्रायव्हरच्याच घरी सापडले १ कोटी

Related Story

- Advertisement -

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी एआयएडीएमकेचे आमदार आर. चंद्रशेखर यांचे चालकाच्या अलगरासामी येथील त्यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. या पथकाने त्याच्या घरातून तब्बल १ कोटी रुपये जप्त केले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून अलगीसराय हे आर. चंद्रशेखर या आमदाराच्या चालकाचे काम करत आहेत. आयटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही रक्कम ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी बरीच रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने ही कारवाई केली. माहिती मिळताच या पथकाने आमदारांच्या प्रत्येक ठिकाणी छापा टाकला. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईध्ये या आयकर विभागाच्या पथकाला मोठे यश मिळाले. यावेळी या पथकाने आमदाराचा चालक अलगीसराय याच्याकडून एक कोटींची रोकड जप्त केली असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी देखील तामिळनाडूमधील एआयएडीएमके नेत्याच्या कारमधून एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिका्यांनी पेट्टावैथालाई पुलावर सुरू असलेल्या तपासणींतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. ही गाडी मुसिरी येथील पक्षाचे विद्यमान आमदार सेल्वराज यांची असल्याचे सांगण्यात आले होते. या निवडणुकीत सेल्वराज यांना एआयएडीएमकेनेही या जागेवर उमेदवार केले आहे.

- Advertisement -

कारमधील चालकांना नोटांच्या गठ्ठ्यांविषयी जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी या प्रकाराबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले. यासह मागील आठवड्यातही श्रीविल्लीपुथूर विधानसभा मतदार संघातून एका वाहनातून ३.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. दरम्यान, तामिळनाडूमध्ये होणारी विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात पार पडणार असून ६ एप्रिल रोजी याठिकाणी मतदान होणार आहे. तर या ठिकाणी २३४ जागांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.


- Advertisement -