घरCORONA UPDATEपहिल्या तीन तासात रेल्वेची १ लाख ८० हजार तिकिटे आरक्षित

पहिल्या तीन तासात रेल्वेची १ लाख ८० हजार तिकिटे आरक्षित

Subscribe

ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु होताच तीन तासांचा या गाड्यांची १ लाख ८० हजार तिकिटे आरक्षित झाली. तर १ जूनला धावणाऱ्या २०० पैकी ७६ ट्रेन फुल्ल झाल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या नागरिकांसाठी भारतीय मार्फत १ जूनपासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. त्यानुसार या गाड्यांचे ऑनलाईन आरक्षण गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाले. ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु होताच तीन तासांचा या गाड्यांची १ लाख ८० हजार तिकिटे आरक्षित झाली. तर १ जूनला धावणाऱ्या २०० पैकी ७६ ट्रेन फुल्ल झाल्या आहेत. उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात जाणाऱ्या गाड्याचे आरक्षण फुल्ल आले आहे.

देशातील वेगवेगळ्या भागातून २००  वातानुकूलित आणि सामान्य श्रेणीच्या ट्रेन धावणार आहेत. सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून देशभरात ट्रेन धावणार आहे. देशातील मजुरांना त्यांच्या मूळगावी  सोडण्यासाठी ‘श्रमिक विशेष ट्रेन’ चालविण्यात १ मेपासून चालविण्यात येत आहे.  गुरुवार सकाळी १० वाजतापासून आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर रेल्वे गाड्याचे बुकिंग सुरु झाले आहे. मात्र १० ते १ वाजेपर्यंत तीन तासांचा या गाड्यांची १ लाख ८० हजार तिकिटे आरक्षित झाली आहे. तर १ जूनपासून दररोज २०० एसी आणि सेकण्ड क्लासच्या ट्रेन चालविण्यात येत आहेत. या गाड्यांना एसी, नॉन एसी आणि जनरल सेकण्ड क्लासचे कोच  असणार असून त्याचे तिकिट दर देखील त्याप्रमाणेच असणार आहे.

- Advertisement -

प्रवासी या गाड्यांचे ३० दिवस आधी आरक्षण करु शकतात. या रेल्वे गाड्यात ज्या प्रवाशांचे तिकीट आरक्षित आहे त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकांत प्रवेश देण्यात येणार आहे. अनारक्षित सीट या ट्रेनमध्ये नसणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर दीड तासा अगोदर उपस्थितीत राहायचे आहे. तसेच, प्रवाशांनी स्वत:चे जेवण, पिण्याचे पाणी व अंथरूण-पांघरूण आणावे, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तसेच  प्रवाशांचे ‘थर्मल स्क्रीनिंग’ सह इतर तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत एखाद्या प्रवाशाला कोरोनाची लक्षणे दिसले त्याला प्रवास करू दिला जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांने रेल्वे प्रशासनाने आखून दिलेल्या अटी आणि शर्तीचा अधीन राहून हा प्रवास करावा, असे आवाहान रेल्वेकडून करण्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -